आतिशी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री; मंत्रिमंडळ बैठकीनंतर घोषणा
Arvind Kejriwal to resign : आम आदमी पार्टी (AAP) च्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या आतीशी मार्लोना या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. आम आदमी पक्षाच्या बैठकीत आज यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या वारसाचा शोध सुरू झाला होता. प्रमुख दावेदारांची चर्चा सुरू होती. यासाठी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती त्यावर आता आतीशी मर्लोना दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

शिला दिक्षीतनंतर आतीशी दिल्लीच्या होणार पहिल्या मुख्यमंत्री
काँग्रेस नेत्या शिला दिक्षीत नंतर आतिशी या दिल्लीच्या दुसऱ्या मुख्यमंत्री असतील तर आम आदमी पक्षाच्या पहिल्याच मुख्यमंत्री राहणार आहेत. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेत सध्या आपचे 60 आमदार आहेत, जे नवीन मुख्यमंत्री निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत राजीनामा जाहीर केल्याने राजधानीच्या राजकारणात खळबळ उडाली होता.

AAP ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीने (PAC) केजरीवाल यांच्या उत्तराधिकारीच्या नावावर चर्चा केली. या बैठकीत अनेक नावांचा विचार करण्यात आला, ज्यामध्ये विद्यमान मंत्री आणि दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची नावे ठळकपणे समोर आली.












Click it and Unblock the Notifications