कर्नाटकात शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक; बागलकोटमध्ये दोन गट भिडले, नेमकी घटना काय? वाचा
Karnataka bagalkot communal tension : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि रमजानचा पवित्र महिना सुरू असतानाच कर्नाटकातील बागलकोटमध्ये जातीय तणावाची मोठी घटना समोर आली आहे. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर कथित दगडफेक झाल्याने हिंसाचार उसळला. या घटनेत बागलकोटचे पोलिस अधीक्षक (SP) सिद्धार्थ गोयल यांच्यासह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

(एआय - फोटो)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी बागलकोट येथील अंबाभवानी मंदिरातून शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक शहरातील एका धार्मिक स्थळाजवळ पोहोचली, त्यादरम्यान वाद उफाळून आला. दोनपैकी एका गटाचा असा आरोप आहे की, धार्मिक स्थळाजवळ प्रार्थना सुरु असताना मिरवणुकीतील डीजेचा आवाज वाढवण्यात आला आणि घोषणाबाजी करण्यात आली. यावरून बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर अचानक मिरवणुकीवर चप्पल व दगड फेकण्यात आले.
हिंसाचार आणि जाळपोळ
दगडफेकीच्या घटनेनंतर मिरवणुकीतील काही कार्यकर्ते संतप्त झाले. त्याचे रूपांतर हिंसक चकमकीत झाले आणि एका गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या ठेल्यांना आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला. या गोंधळात दगड लागल्याने एसपी सिद्धार्थ गोयल यांच्या मानेला दुखापत झाल्याचे वृत्त आहे, मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.
सध्याची स्थिती
- चोख पोलिस बंदोबस्त: बागलकोटमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
- पोलिसांचे शांततेचे आवाहन: रात्री ११ वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- कारवाई: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवली जात आहे.
दोषींवर कठोर कारवाई होणार
कर्नाटकच्या बागलकोटचे एसपी सिद्धार्थ गोयल म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. आमच्यावरही दगडफेक करण्यात आली. परंतु कोणीही जखमी झाले नाही. आम्ही दोषींना अटक करू आणि कठोर कारवाई करू."ऑ
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications