जमशेदपूर येथे हावडा-मुंबई एक्स्प्रेसला अपघात, 18 डबे रुळावरून घसरले, 2 जण ठार, 20 प्रवासी जखमी
झारखंडमधील जमशेदपूर येथे आज पहाटे 3.43 वाजता मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले.
या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राजखरस्वान-बडाबांबो दरम्यान अपघात
राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान हा अपघात झाला असून जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात नेण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून चक्रधरपूर रेल्वे विभागाने सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडून मदत गाडी आणि सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
नेमका कसा झाला अपघात
आज सकाळी झारखंडमध्ये हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी क्रमांक 12810 चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली. हा अपघात चक्रधरपूर विभागात राजखरसावन वेस्ट आऊटर आणि बारांबू दरम्यान घडला. या घटनेत 20 पेक्षा अधिक जखमी झाले असून, प्रशासन तातडीच्या उपाययोजना करत आहेत.

रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी सर्व जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार केले. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेदरम्यान ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले आणि त्यामुळे प्रवासी जखमी झाले.
चक्रधरपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी मोठी माहिती दिली आणि सांगितले की, एक रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी संसाधने देखील एकत्रित केली. सध्या रुळावरून घसरण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
Jharkhand: Train No. 12810 Howara-CSMT Express derailed near Chakradharpur, between Rajkharswan West Outer and Barabamboo in Chakradharpur division at around 3:45 am. ARME with Staff and ADRM CKP on site. 6 persons have been injured. All have been given first aid by the Railway… pic.twitter.com/dliZBvtoFk
— ANI (@ANI) July 30, 2024
रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
- मुंबई: 022-22694040
- सीएसएमटी हेल्पलाइन नंबर: 55993
- नागपुर: 7757912790
- टाटानगर: 06572290324
- चक्रधरपुर: 06587 238072
- राउरकेला: 06612501072, 06612500244
- हावड़ा: 9433357920, 03326382217
- रांची: 0651-27-87115.
- एचडब्ल्यूएच हेल्प डेस्क: 033-26382217, 9433357920
- एसएचएम हेल्प डेस्क: 6295531471, 7595074427
- केजीपी हेल्प डेस्क: 03222-293764
- पीएंडटी: 022-22694040

या महिन्यातील रेल्वे अपघात
सोमवारी बिहारच्या समस्तीपूरमध्ये बिहार संपर्क एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. रेल्वेचे इंजिन आणि एक डबा रुळांवर धावू लागला. बाकीचे डबे मागे राहिले. इंजिनानंतर डब्याचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
18 जुलैला यूपीत दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली होती
18 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 21 बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले. जिलाही रेल्वे स्थानकादरम्यान गोसाई दिहवा येथे हा अपघात झाला.












Click it and Unblock the Notifications