Jharkhand Election : अन्य पक्षातून आलेल्या 8 जणांना दिले भाजपने तिकीट; JMM नेत्यांचा BJP वर हल्लाबोल
Jharkhand Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्षाने (BJP) झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या यादीत 66 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत भाजपने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेससह इतर पक्षांतून आलेल्या 8 नेत्यांना तिकीट दिले आहे. यावर झामुमोचे खासदार महुआ मांझी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. स्वत:ला मजबूत म्हणणाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी माणसं सापडत नाही.
खासदार महुआ मांझी म्हणाले की, आमच्या पक्षातूनही अनेक नेत्यांना तिकीट देण्यात आले. भाजप जर स्वत:ला बलाढ्य पक्ष म्हणवून घेते, पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांना तिकीट देण्यासाठी माणसं तरी मिळतात का, आम्ही या निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत, यावेळीही झारखंड मधील जनता भाजपला साथ देणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे.

रविवारी 66 उमेदवारांची यादी जाहीर
दुसरीकडे भाजपने रविवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) मधून आलेल्या 3 नेत्यांना उमेदवारी दिली आहे. जेएमएमचे चंपाई सोरेन यांना सरायकेला, बाबुलाल सोरेन यांना घाटशिला, लोबिन हेमब्रम यांना बोरियो मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तसेच काँग्रेसमधून आलेल्या मनोज यादव यांना बार्ही, मंजू देवी यांना जमुआ आणि सनी टोप्पो यांना मंदार मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कमलेश सिंग यांना हुसैनाबादमधून आणि एजेएसयूचे रोशनलाल चौधरी यांना बरकागावमधून तिकीट मिळाले आहे.
हे ही वाचा : झारखंड विधानसभा निवडणूक; भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, 66 जणांचा समावेश
अन्य पक्षातून आलेल्या या उमेदवारांना भाजपकडून तिकीट
1. चंपाई सोरेन : सेराईकेला विधानसभा जागा (ते JMM मधून भाजपमध्ये सामील झाले आहेत)
2. बाबूलाल सोरेन : घाटशिला विधानसभा जागा (ते JMM मधून भाजपमध्ये सामील झाले आहेत)
3. लोबिन हेमब्रम : बोरियो विधानसभा जागा (ते JMM मधून भाजपमध्ये दाखल झाले)
4. मनोज यादव : बार्ही विधानसभा जागा (काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे)
5. मंजू देवी : जमुआ विधानसभा जागा (काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाल्या)
6. सनी टोप्पो : मंदार विधानसभा जागा (तो काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाला आहे)
7. कमलेश सिंह : हुसेनाबाद विधानसभा जागा (ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत)
8. रोशन लाल चौधरी : बरकागाव विधानसभा जागा (ते AJSU मधून भाजपमध्ये सामील झाले आहेत)












Click it and Unblock the Notifications