झारखंड विधानसभा निवडणूक; भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, 66 जणांचा समावेश
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये चंपाई यांनी पक्ष सोडला होता.
याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि अर्जुन मुंडा यांच्या पत्नींनाही तिकीट देण्यात आले आहे. मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना जगन्नाथपूरमधून, अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांना पोटकामधून तिकीट देण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना धनवरमधून तर सीएम हेमंत सोरेन यांच्या मेहुणी सीता सोरेन यांना जामतारा येथून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपा केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले झारखण्ड विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/onqghIJeGV
— BJP JHARKHAND (@BJP4Jharkhand) October 19, 2024
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान
झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील.
तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
1. धनवर - बाबूलाल मरांडी
2. राजमहल - अनंत ओझा
3. बोरियो - लोबिन हेम्ब्रेम
4. लिटीपाडा - बाबुधन मुर्मू
5.महेश्वर - नवीन हेंब्रेम
6. शिकारीपाडा - परितोष सोरेन
7.नाला - माधवचंद्र महतो
8.जामतारा - सीता सोरेन
9. दुमका - सुनील सोरेन
10. जारमुंडी - देवेंद्र कुंवर
11. मधुपूर - गंगा नारायण सिंह
13. सारथ - रणधीर कुमार सिंग
14. देवघर - नारायण दास
15. पोडाईहाट - देवेंद्रनाथ सिंह
16. गोड्डा - अमितकुमार मंडल
17. महागमा - अशोककुमार भगत
18. कोडरमा - नीरा यादव
19. बरकथा - अमितकुमार यादव
20, बार्ही- मनोज यादव
२१. बरकागाव - रोशनलाल चौधरी
22. हजारीबाग - प्रदीप प्रसाद
२३, सिमरिया - उज्ज्वल दास
24 बगोदर - नागेंद्र महतो
25 जमुआ - मंजू देवी
26 गंडा - मुनिया देवी
27 गिरिडीह - निर्भय कुमार शहााबादी
28 बारमो - रवींद्र पांडे
29. बोकारो - बिरांची नारायण
30. चंदनकियारी - अमरकुमार बौरी
31. सिंद्री - तारा देवी
32 निरसा - अपर्णा सेनगुप्ता
33. धनबाद - राज सिन्हा
34 झरिया - रागिणी सिंग
35. बागमारा - शत्रुघ्न महतो
36. बहरगोरा - दिनेशानंद गोस्वामी
37. घाटशिला - बाबूलाल सोरेन
38. पोटका - मारा मुंडा
39. जमशेदपूर पूर्व - पूर्णिमा दास साहू
40. सेराईकेला - चंपाई सोरेन
41. चाईबासा - गीता बालमुचू
42. माझगाव - बारकुंवर गगराई
43. जगन्नाथपूर - गीता कोडा
44. चक्रधरपूर - शशिभूषण समद
45. खरसावन- सोनाराम बोदरा
46. तोरपा - कोचे मुंडा
47. खुंटी - नीलकंठ सिंग मुंडा
48. खिजरी - रामकुमार पाहन
49. रांची - सी पी सिंग
50. हटिया - नवीन जैस्वाल
51 कणके - जीतू चरण राम
52. मंदार - सनी टोप्पो
53. सिसाई - अरुण ओराव
54. गुमला - सुदर्शन भगत
55 बिष्णुपूर - समीर ओराव












Click it and Unblock the Notifications