Jammu Kasmir Assembly Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार थांबला, आता उद्या मतदान
Jammu Kasmir Assembly Election 2024 : जम्मू पहिली काश्मीरमध्ये काल सोमवारी प्रचाराचा धुराळा शांत झाला असून प्रॉक्सी, दहशतवाद, तुरुंग, भीती यासह अनेक मुद्द्यांवर प्रचार झाला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले आहेत. आता उद्या 18 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये मतदान होणार आहे.
या टप्प्यात 24 जागांवर मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागांवर राजकीय पक्षांचा प्रचार सुरू असला तरी सोमवारी सायंकाळी निवडणुकीचा प्रचार संपला. केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बहुस्तरीय सुरक्षेचा भाग म्हणून केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दल (CAPF) आणि पोलीस तैनात केले जात आहेत.

सर्वच पक्षांची ताकद पणाला
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, एनडीए आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली.
कलम 370 चा मुद्दा गाजला
निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यात, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. या काळात प्रॉक्सी वॉरही खूप तीव्र झाले. दुसरीकडे, केंद्रशासित प्रदेशात मोदी सरकारच्या कार्यकाळात शिक्षण, शांतता आणि सुरक्षा यासह मूलभूत सुविधांबाबत जम्मू-काश्मीरमध्ये विकास आणि केलेल्या कामांच्या नावाखाली भाजपने मते मागितली.
काय म्हणाले अमित शहा..?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सोमवारी एका निवडणूक सभेत सांगितले की, जोपर्यंत मोदी सरकार आहे, तोपर्यंत देशाच्या भूमीवर दहशतवाद पसरवण्याचे धाडस कोणाला होणार नाही. भाजप सरकारने ग्रामसंरक्षण रक्षक आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांना बळ दिले असून, त्यांना आधुनिक शस्त्रे देऊन सक्षम केले जात आहे.
पहिल्या टप्प्यात येथे मतदान
पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी म्हणजेच उद्या (18 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात, दोडा, किश्तवार आणि रामबन या चिनाब खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या चोवीस विधानसभा क्षेत्र आणि अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान या दक्षिण काश्मीर जिल्ह्यांमध्ये मतदान आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांसाठी 25 सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्यातील 40 जागांसाठी 5 सप्टेंबरला मतदान होणार आहे.












Click it and Unblock the Notifications