Jammu Kashmir News जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला! पर्यटकांवर गोळीबार, 16 जणांचा मृत्यू!

Jammu Kashmir News Update Terrorists attack tourists in Pahalgam : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला आहे. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले असून त्यांच्या हल्ल्यात एकाला गोळी लागली तर एकूण 16 मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे काही माध्यमांनी या हल्ल्यात जवळपास 26 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, या हल्ल्यात जवळपास 12 जण जखमी झाले आहेत.

Jammu Kashmir News

(संग्रहित फोटो)

दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर या घटनेची माहिती समजताच सुरक्षायंत्रणांनी ऑपरेशन सुरु केले आहे. दहशतवाद्यांचा भारतीय जवान शोध घेत असल्याचे टीव्ही 9 च्या वृत्तात म्हटले आहे.

Take a Poll

पहेलगाममध्ये पर्यटकांच्या समुहावर हल्ला

जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो लक्ष्यित होता अशी शक्यता आहे कारण दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समुहावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत.

अमित शहा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असताना हल्ला

प्राप्त माहितीनुसार, अमित शहा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अशा स्थितीत अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगाम येथे दहशदवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. त्यानंतर जवानांनीही आता दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु केली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पर्यटकांसाठी जम्मू-काश्मीर नंदनवन आहे, अशातच तिथे मुक्त आणि भितीविरहीत पर्यटन करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे, अशा स्थितीत दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

केदारनाथ बद्रीनाथ यात्रा लवकरच

दरम्यान केदारनाथ आणि बद्रीनाथ ही जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सर्वात महत्वाची यात्रा सुरु होणार आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असते. त्यामुळे या यात्रेसाठी चोख सुरक्षाव्यवस्था केली जाते आणि व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शक सुचनानुसारच ही यात्रा चालू राहते अशातच ही यात्रा जवळ येत असून लाखो भाविक बाबा भोलेनाथच्या दर्शनासाठी येत असतात अशातच पर्यटकांवर हल्ला झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

पहेलगाममध्ये असते पर्यटकांची रेलचेल

पहेलगाम हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे, या ठिकाणी पर्यटकांची मोठी रेलचेल असते. अशातच पर्यटकांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जवळपास, दहा पर्यटक तरी जखमी झाले असतील अशी शक्यता आहे तर आतापर्यंत सहा पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+