Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी :जयपूरमध्ये केमिकल टँकरचा स्फोट! 7 जणांचा जळून मृत्यू, 20 वाहने खाक 30 पेक्षा अधिक जखमी

Jaipur Chemical tanker explosion : जयपूरमध्ये रसायनाच्या टँकरचा स्फोट झाल्याने 7 जणांचा जळून मृत्यू झाला असून जवळपास 20 वाहनांना आग लागली आहे. या दुर्घटनेत 30 पेक्षा अधिक व्यक्ती भाजले असून एक कारखानाही जळाला आहे. ही भीषण घटना आज सकाळी सहाच्या सुमारासा घडली. दरम्यान अजमेर महामार्ग बंद करण्यात आला आहे.

कुठे घडली घटना

राजस्थानच्या जयपूरमधील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट झाला. अजमेर हायवेवर केमिकलमुळे लागलेल्या आगीत 7 जण जिवंत जळाले. सकाळी 6 च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आता बचावकार्य सुरु आहे.

Jaipur Chemical tanker explosion

काय म्हणाले जयपूरचे डीएम?

जयपूरचे डीएम (डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट) जितेंद्र सोनी म्हणाले, "4 लोकांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. सुमारे 40 बंबामार्फत आग विझवली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे आणि या घटनेत 23 ते 24 जण जखमी झाले आहेत.

वेगाने बचावकार्य

सूत्रांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या धाडसी परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. सीएनजी टँकर अपघातातील मृत्यूची अधिकृत आकडेवारी जयपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, रस्त्यालगत उभी केलेली वाहने आणि पेट्रोल पंप, एकमेकांना धडकून वाहने पेटली आणि गोदामांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे! पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर असून बचावकार्य आणि मदतकार्य वेगाने पुर्णत्वाकडे जात आहे.

राजस्थानच्या जयपूर भागातील भानक्रोटा परिसरात हा भीषण अपघात झाला. यात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास तीसपेक्षा अधिक लोक होरपळले आहेत. तूर्त अधिकृत आकडेवारी अजून समोर आली नाही पण जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी आतापर्यंत 23 ते 24 जण होरपळून जखमी झाल्याचे सांगितले आहे. आग एवढी भीषण होती की, ज्वाळांनी या भागात धुराळा झाला होता. तसेच आगीने वेगाने वेढा घेतला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+