Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कौतुकास्पद..! IRCTC ची प्रयागराज येथे महाकुंभ ग्राम टेंट सिटी; अत्यल्प दरात मिळणार प्रिमिअम सुविधा

MahaKumbh Mela 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. या कुंभमेळ्याची पूर्ण तयारी झाली असून, पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे. पर्यटकांची गर्दी व सुविधा लक्षात घेताल इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने यात्रेकरुंसाठी टेंट सिटीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. महाकुंभमेळ्याचा आनंद सर्वांना घेता यावा व प्रयागराजची सहल आनंददायी व आरामदायी व्हावी, यासाठी IRCTC ने टेंट सीटीची संकल्पना राबविली आहे. अत्यंत वाजवी दरात पर्यटकांना राहण्याची व खाण्यापिण्याची सोय यात होणार आहे.

irctc

कोठे आहे टेंट ग्राम?

सेक्टर-25 एरेल रोड, नैनी येथील त्रिवेणी संगमापासून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर हे टेंट ग्राम आहे. आंघोळीचे घाट व इतर आकर्षणे सुविधा तेथे देण्यात आल्या आहेत. कुंभ ग्राम ही एक अत्याधुनिक निवास सुविधा आहे, जी खास पर्यटकांसाठी तयार करण्यात आली आहे. येथे पर्यटकांना व भाविकांना सर्व आधुनिक सुविधांनी मिळणार आहेत. ही टेंट सिटी त्रिवेणी घाटाच्या अगदी जवळ असल्याने त्याचा दुहेरी फायदा होणार आहे.

IRCTC

काय आहेत सुविधा?

सुपर डिलक्स टेंट आणि व्हिला टेंट्स अशा दोन पद्धतीच्या सुविधा येथे मिळणार आहेत. बाथरूम, चोवीस तास गरम आणि थंड पाण्याची सुविधा, दिवसभर हॉस्पिटॅलिटी, लिननचे बेड, टॉवेल आणि टॉयलेटरीज आदी सर्व सुविधा आकर्षक दरात देण्यात आल्या आहेत. या सुविधेत जेवणांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्हिला टेंटमध्ये पाहुण्यांना बसण्याची स्वतंत्र आरामदायी सुविधा व टीव्हीचा आनंदही घेता येणार आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणी असल्याने सुरक्षितही आहे.

IRCTC

हाँस्पिटॅलिटीची सुविधा

IRCTC महाकुंभ ग्राम टेंट सिटीला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ओळखले जाते. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले मेसर्स लल्लूजी अँड सन्स (कुंभ कॅनव्हास येथे) हे महाकुंभ 2025 मध्ये IRCTC चे कॅम्पिंग आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत. बुकिंगसाठी IRCTC च्या ग्राहक समर्थन टीमशी 8076025236 वर संपर्क साधण्याचे किंवा [email protected] वर ईमेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IRCTC

कसे करावे बुकींग?

IRCTC ने त्याच्या www.irctctourism.com/mahakumbhgram या वेबसाइटवर कुंभ ग्राम टेंट सिटीसाठी बुकिंग उघडले आहे. बुकींग करण्यासाठी खालील पर्यात निवडा
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
• तुमच्या ब्राउझरमध्ये URL: www.irctctourism.com/mahakumbhgram प्रविष्ट करून अधिकृत IRCTC महाकुंभ टेंट सिटी पृष्ठावर नेव्हिगेट करा.
2. तुमच्या खात्यात लॉग इन करा
• तुमच्या विद्यमान IRCTC खात्यात लॉग इन करून सुरुवात करा. तुमच्याकडे आधीपासून खाते नसल्यास, तुमचा ईमेल पत्ता आणि फोन नंबर देऊन तुम्ही "अतिथी वापरकर्ता" म्हणून लॉग इन करू शकता.
3. "आता बुक करा" पर्यायावर क्लिक करा
• महाकुंभ ग्राम पृष्ठाच्या मुख्यपृष्ठावर, "आता बुक करा" बटण शोधा आणि बुकिंग फॉर्मवर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा.
4. निवास तपशील भरा
• तुमच्या मुक्कामासाठी आवश्यक तपशील द्या.
• स्थान
• चेक-इन तारीख आणि चेक-आउट तारीख
• खोल्या आणि पाहुण्यांची संख्या
5. तंबू प्रकार निवडा
• तुमची पसंती आणि बजेटवर आधारित तंबूंच्या दोन श्रेणींमधून निवडा- सुपर डिलक्स टेंट आणि व्हिला टेंट.
6. वैयक्तिक तपशील भरा
• तुमचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, ईमेल पत्ता आणि तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही विशेष आवश्यकतांसह आवश्यक वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा.
7. पेमेंट पद्धत निवडा
• डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा डिजिटल वॉलेट्स यांसारख्या सुरक्षित पर्यायांच्या श्रेणीमधून तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा.
• कोणतेही छुपे शुल्क समाविष्ट केलेले नाही याची खात्री करून प्रदर्शित केलेल्या एकूण खर्चाचे पुनरावलोकन करा.
8. बुकिंग पूर्ण करा
• पेमेंटवर यशस्वीरीत्या प्रक्रिया झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश आणि तुमच्या बुकिंग तपशीलांसह ईमेल प्राप्त होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+