आयफोन 16 प्रो आणि आयफोन 15 प्रो मध्ये काय फरक ? तुम्ही कोणता फोन खरेदी करणार ?
iPhone 16 Pro vs iPhone 15 Pro: Apple ने 'Its Glowtime' कार्यक्रमात आपल्या चार नवीन iPhone सादर केले आहेत. कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro Max ची किंमत त्यांच्या जुन्या मॉडेल्सप्रमाणेच ठेवली आहे, तर iPhone 16 Pro ला गेल्या वर्षीच्या iPhone 15 Pro च्या तुलनेत किंमतीत कपात केली आहे.
आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट iPhone 16 Pro आणि iPhone 15 Pro मधील सर्व फरक सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही किंमत लक्षात घेऊन स्वतःसाठी योग्य आयफोन निवडू शकाल.
डिस्प्ले - आयफोन 16 प्रो पुर्वीच्या फोनपेक्षा थोडा मोठा आहे, जरी स्क्रीनमध्ये आता पातळ बेझल आहे. याशिवाय, लेटेस्ट iPhone 16 Pro मध्ये स्क्रीनवर हार्ड सिरेमिक शील्ड संरक्षण देखील आहे. iPhone 16 Pro चे इतर डिझाईन्स iPhone 15 Pro सारखेच आहेत. जरी आयफोन 16 प्रो मध्ये त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा मोठा डिस्प्ले आहे, परंतु त्यांची फिचर जवळजवळ सारखीच आहेत.

परफॉरमेंस - iPhone 16 Pro A18 Pro चिपसेटसह उपलब्ध करून देण्यात आले आहे. परफॉरमेंसच्या बाबतीत याबद्दल एक मोठे अपडेट आहे. टेक जायंटच्या मते, 3nm A18 Pro CPU परफॉरमेंसमध्ये 15% वाढ देते आणि A17 Pro च्या तुलनेत 20% वेगवान GPU आहे. याव्यतिरिक्त एकूण सिस्टम बँडविड्थमध्ये 17% वाढ देखील आहे.
सॉफ्टवेअर - आयफोन 16 प्रो आणि आयफोन 15 प्रो दोन्ही Apple च्या सॉफ्टवेअरची लेटेस्ट वर्जन iOS 18 चालतील. तसेच आधीच्याला फोनला OS आणि सॉफ्टवेअर अपटेड एक वर्ष अतिरिक्त मिळेल.
कॅमेरा- iPhone 16 Pro मधील सर्वात मोठे अपग्रेड कॅमेरामध्ये देखील झाले आहे. जरी आयफोन 15 प्रो आणि 16 प्रो दोन्हीमध्ये समान 48MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. परंतु कंपनीने इतर दोन शूटर्स अपग्रेड केले आहेत. सर्वात आधी अल्ट्रावाइड लेन्स आता 48MP शूटर वापरते, जे कमी-प्रकाशात चांगले चांगले फोटो आणि शूट करता येईल.. याशिवाय iPhone 16 Pro मध्ये 3x टेलीफोटो सेन्सरऐवजी नवीन 5x झूम कॅमेरा देण्यात आला आहे, जो iPhone 16 Pro Max आणि 15 Pro Max सारखा आहे. iPhone 16 Pro चा फ्रंट कॅमेरा 120fps पर्यंत 4K व्हिडिओ देखील कॅप्चर करू शकतो, जो पूर्वी iPhone 15 Pro वर 1080p पर्यंत मर्यादित होता.
बॅटरी- iPhone 16 Pro ची बॅटरी बद्दल सध्यातरी कोणतेही माहीती समोर आलेली नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो, iPhone 15 Pro मध्ये 4,383mAh बॅटरी आहे.
कलर- iPhone 16 Pro ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम, डेझर्ट टायटॅनियम रंगांमध्ये खरेदी करता येईल. तर, आयफोन 15 प्रो ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियममध्ये खरेदी करु शकता.
IP रेटिंग- दोन्ही फोनमध्ये पाणी आणि धूळपासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग आहे.
किंमत- कंपनीने 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16 Pro लॉन्च केला आहे. अलीकडेच iPhone 15 Pro ची किंमत 1,24,200 रुपये (Amazon) पर्यंत घसरली असूनही, ते लेटेस्ट iPhone 16 Pro पेक्षा अधिक महाग आहे. याशिवाय, iPhone 16 Pro च्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत बरेच फायदे देखील आहेत. जर तुम्हाला कोणता रिटेलर आयफोन 15 प्रो रु. 1,00,000 पेक्षा कमी किंमतीत विकत असेल तर आम्ही तुम्हाला ते खरेदी करण्यास सुचवू. दरम्यान जर तुम्ही एक लाखापेक्षा जास्त किमतीत iPhone 16 Pro विकत घेत असाल तर तुमच्यासाठी iPhone 16 Pro खरेदी करणे अधिक चांगले असेल. याशिवाय iPhone 16 Pro मध्ये आता iPhone 16 Pro Max सारखीच फिचर आहेत.












Click it and Unblock the Notifications