Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

International Happiness 2025 : आनंद दिवस कधी असतो, जाणून घ्या- त्याचा इतिहास अन् काय आहे महत्त्व

International Day Of Happiness 2025 : आनंदी राहणे हे प्रत्येकाच्याच हातात असते. प्रत्येक व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. जगभरात दरवर्षी 20 मार्चला आंतरराष्ट्रीय आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्राने हा दिवस 2013 सालापासून साजरा करण्यास सुरुवात केली. त्याचा प्रस्ताव 12 जुलै 2012 रोजी मान्य झाला. या संकल्पाची सुरुवात भूतानमध्ये झाली. या देशाने राष्ट्रीय आनंदी दिवसावर प्रकाश टाकला होता. यंदाच्या म्हणजेच 2025 सालच्या आनंद दिवसाचे महत्त्व काय आहे, ते कसे साजरे केले जाते, यंदाची थीम काय आहे, यावर एक नजर टाकूया...!

International Happiness 2025

(इंमेज सोर्स- एआय जनरेट)

आनंद दिनाचा काय आहे इतिहास?

1970 च्या सुमारास भुतानने राष्ट्रीय आनंदाच्या मुल्यांना राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अधिक प्राधान्य दिले. 66 व्या आमसभेत, भूतानला राष्ट्रीय आनंदाचे ध्येय स्वीकारण्यास प्राधान्य देणारा देश म्हणून ओळखला गेला. तर, संयुक्त राष्ट्राने 2015 साली 17 शाश्वत विकासाला प्राधान्य दिले. यात गरीबी संपविणे, असमानता कमी करणे आदी उद्दिष्टांचा समावेश होता.

या गोष्टींना प्राधान्य देण्याचे कारण या प्रमुख पैलूंमुळे जगभरातील नागरिकांचे कल्याण तसेच त्यांचा आनंद सामावलेला होता. आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाचे महत्व मोठे आहे. कारण कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आनंद ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

ज्या दिवशी आपल्याला आनंदी राहणे किती महत्वाचे आहे हे समजेल, त्यानंतर आपण जास्त चांगलं काम करू. तसेच आपलं आयुष्य वाढेल. संयुक्त राष्ट्राचेही जगातल्या सर्व लोकांचे लोकांचे ध्येय आणि आकांक्षा अशीच असली पाहिजे, असे मत आहे.

आंतरराष्ट्रीय आनंद दिन: महत्त्व

आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. तो प्रत्येकाला, मग तो कुटुंब असो, विद्यार्थी असो, सहकारी असो किंवा अगदी समुदाय असो, थोडा वेळ थांबून त्यांच्या जीवनात खरोखर आनंद आणि आनंद कशामुळे मिळतो यावर विचार करण्यास प्रोत्साहित करतो.

शिवाय, हा दिवस लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत त्यांचा दिवस आणि वेळ कसा घालवायचा याला प्राधान्य देण्यास देखील प्रेरित करतो. जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी, अधिक कृतज्ञता बाळगणे, गरजू लोकांना मदत करणे किंवा जीवनातील साध्या आणि लहान क्षणांचे कौतुक करणे आवश्यक आहे कारण हे सर्व जीवनात आनंद आणते.

आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2025 ची थीम?

दरवर्षी आनंद दिनाची एक थीम ठरते. त्या थीमवर विविध संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम घेतले जातात. यंदा 2025ला आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची थीम 'केअरिंग आणि शेअरिंग' अशी ठरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+