भारतीय रेल्वेचे 'Swarail' अॅप लाँच! आता रेल्वे तिकिट बुकींग होणार झटपट, प्रवाशांना या सुविधा मिळणार
Indian Railway Swarail App : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नेहमी खास काही ना काही करत असते. भारतातील रेल्वे ही जगातील कुतुहुलाचा विषय आहे. भारतीय लोकांची रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. त्यामुळेच रेल्वेही प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी कटीबद्ध आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एक नवीन सुपर अॅप लाँच केले आहे, ज्याचे नाव 'स्वरेल' अर्थात Swarail आहे.
आता प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून ते ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत, पीएनआर स्टेटस जाणून घेण्यापासून ते रेल्वेशी संबंधित कोणतीही माहिती मिळण्यापर्यंत सर्व काही एकाच अॅपमध्ये मिळेल. याचा अर्थ असा की आता तुम्हाला रेल्वे तिकिटांसाठी रेल्वे स्थानकावर फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

'स्वरेल' अॅपचे फायदे
हे अॅप भारतीय रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) ने विकसित केले आहे. प्रवासी आता 'स्वरेल' सुपर अॅपद्वारे आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतील. याशिवाय, या अॅपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग देखील करता येते. यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासाची तयारी करण्यात आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या इतर समस्यांमध्ये मोठा दिलासा
मिळेल.
'स्वरल' अॅपचे वैशिष्ट्य
'स्वरल' अॅपचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ट्रेन धावण्याचा वेळ, वेळापत्रक आणि कोचची स्थिती यासारखी माहिती देखील त्यात उपलब्ध असेल. यासोबतच, प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील मिळेल, जेणेकरून त्यांना प्रवासादरम्यान जेवणाची काळजी घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अॅपवरील 'रेल मदत' वैशिष्ट्याद्वारे, प्रवासी रेल्वेशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतात आणि त्यांची स्थिती देखील ट्रॅक करू शकतात.
अॅप कसे वापरावे?
- 'स्वरेल' अॅप वापरण्यास खूप सोपे आहे. यासाठी प्रवाशांना एकदा नोंदणी करावी लागेल.
- साइन-अप करताना मोबाईल नंबर, वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरता येईल.
- एकदा साइन अप केल्यानंतर, हे अॅप आयआरसीटीसी रेलकनेक्ट आणि यूटीएस मोबाईल अॅप सारख्या इतर भारतीय रेल्वे अॅप्सवर देखील वापरले जाऊ शकते.
स्वरेल हे रेलकनेक्ट आणि यूटीएसपेक्षा किती वेगळे आहे?
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आयआरसीटीसी, रेलकनेक्ट आणि यूटीएस सारखी जुनी अॅप्स पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील, परंतु 'स्वरेल' अॅपद्वारे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी एकत्रित करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, स्वारेल अॅपवर सर्व सुविधा एकत्रित करून एकाच ठिकाणी देण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना वेगळे अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर बीटा व्हर्जनमध्ये वापरले जाऊ शकते आणि ते गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते.
'स्वेरल' अॅपमध्ये तुम्हाला काय मिळेल?
सिंगल साइन-ऑन : एकाच ओळखपत्राने सर्व सेवांमध्ये प्रवेश शक्य होईल. याचा अर्थ असा की आता प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्रपणे लॉगिन करण्याची आवश्यकता राहणार नाही.
ऑल-इन-वन अॅप : पूर्वी प्रवाशांना तिकीट बुकिंग, वेळापत्रक तपासणी आणि इतर सेवांसाठी स्वतंत्र अॅप्सची आवश्यकता होती परंतु आता ही सर्व वैशिष्ट्ये एकाच अॅपमध्ये उपलब्ध असतील.
एकात्मिक सेवा : विविध स्त्रोतांकडून मिळणारी माहिती एकात्मिक पद्धतीने अॅपवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल.
सोपे साइन-अप आणि लॉगिन : वापरकर्त्यांसाठी साइन-अप आणि लॉगिन प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद करण्यात आली आहे. वापरकर्ते एम-पिन किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून सहजपणे लॉगिन करू शकतात.












Click it and Unblock the Notifications