शेतकऱ्याने बांधले पंतप्रधान मोदींचे मंदिर,रोज करतात पूजा, जाणून घ्या कारण
नवी दिल्ली : तामिळनाडूतील त्रिची जिल्ह्यात एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे. येरकुडी गावातील रहिवासी असलेल्या शंकरने काही पैसे वाचवून आणि बँकेकडून कर्ज घेऊन पंतप्रधान मोदींचे मंदिर बनवले आहे. ते दररोज सकाळी मंदिरात प्रार्थना देखील करतात. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांनी शंकर प्रभावित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर अनेक वर्षांपासून दुबईत काम करत होते, मात्र काही वर्षांपूर्वी ते आपल्या गावी परतले आणि तिथे शेती करू लागले. शंकर सांगतात यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप आवडतात. त्यांनी आजवर देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे काही पाऊल उचलले ते कौतुकास्पद आहे. पीएम मोदींचे कार्य आणि देशाप्रती असलेल्या समर्पणामुळे आज देश-विदेशातील लोक त्यांच्याबद्दल बोलतात.
शेतकरी शंकर म्हणाले की, पीएम मोदींबद्दल असलेला आदर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. त्या मंदिरात पंतप्रधानांची मूर्तीही बसवण्यात आली आहे, शंकर हे रोज या मुर्तीची पूजा करतात.
पुढे बोलताना शंकर म्हणाले की, मी 2019 मध्ये माझ्या शेतात भारतात पहिले मंदिर बांधले. मंदीरासाठी सुमारे 1.25 लाख रुपये खर्च झाला आहे. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत दिलेल्या योजनांचे चांगले फळ मिळाले. त्यामुळे मी त्यांना देव मानून त्यांची रोज पूजा करत आलो आहे. मी पाच वर्षांसाठी चांगली रक्कम ठेवली आहे, ज्यामध्ये प्रत्येक पिकातून 10,000 रुपये नफा मिळतो.
शंकर पुढे म्हणाले की, मी पलानीमलाई मुरुगन (लोरे मुरुगा मंदिर, पलानी, दिंडीगुल जिल्हा) येथे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रार्थना केली होती. आता ती प्रार्थना पूर्ण झाली आहे, त्यामुळे पुढच्या महिन्याच्या शेवटी मी नवस पूर्ण करणार आहे. याशिवाय मी माझ्या शेतात पिकवलेल्या धान्यातून एक हजार लोकांना जेवण पण देणार आहे. या मंदिरासाठी मी माझ्या जमिनीचा काही भाग दान केला आहे. मी ह्या जगात नसल्यानंतर ही मंदिर कायम राहावे अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या शेतातील सर्व उत्पादन मंदिरात आणतो आणि ते अर्पण केल्यानंतरच मी बाजारात नेतो. पंतप्रधान मोदी दीर्घायुष्य आणि निरोगी राहावेत. मला त्यांना पुढच्या वेळीही पंतप्रधानपदी पाहायचे आहे.












Click it and Unblock the Notifications