शेतकऱ्यांसाठी खुशखबर! IMDने पावसाचा अंदाज वर्तविला, जाणून घ्या- यावर्षी कुठे-कसा असणार पाऊस
IMD Rainfall Prediction Forecast Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाने अर्थात आयएमडीच्या वतीने मंगळवारी यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यावेळी जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
104 ते 110 टक्के पाऊस सामान्यपेक्षा चांगला मानला जातो. हे पिकांसाठी एक चांगले संकेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या पासवाच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. शेतकरी सुखावणारे चित्र यंदाच्या पावसामुळे पाहता येणार आहे.

आयएमडी प्रमुख काय म्हणाले?
- आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, 2025 मध्ये 105% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो.
- 4 महिन्यांच्या मान्सून हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) 868.6 मिमी म्हणजेच 86.86 सेमी आहे.
- अर्थात पावसाळ्यात एकूण एवढा पाऊस पडायला पाहिजे, असा अंदाज आयएमडीच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
1 जूनच्या सुमारास मान्सून केरळमार्गे येतो. 4 महिने पाऊस पडल्यानंतर, म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी, मान्सून राजस्थानमार्गे परत येतो. ते 15 ते 25 जून दरम्यान अनेक राज्यांमध्ये तो पाऊस पोहोचतो.
मे-जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढतील
आयएमडीच्या वतीने सांगण्यात आले की, यावर्षी एल निनोची परिस्थिती निर्माण होणार नाही. सध्या देशाच्या अनेक भागात तीव्र उष्णता आहे. एप्रिल आणि जूनमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या वाढेल. यामुळे पॉवर ग्रिडवर दबाव वाढेल आणि पाण्याची कमतरता निर्माण होईल.
देशातील 52 टक्के कृषी क्षेत्र मान्सूनवर अवलंबून
देशातील 52 टक्के कृषी क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे. पावसाळ्यामुळे पाण्याच्या स्रोतांची कमतरता भरून निघते. अशा परिस्थितीत, सामान्य मान्सून ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे.
हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आता मान्सूनमध्ये पावसाळी दिवसांची संख्या कमी होत आहे आणि मुसळधार पाऊस वाढत आहे. यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येत आहेत.
पावसाची टक्केवारी कशी काढली जाते?
- हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत.
- 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस - अपुरा पाऊस
- 90 ते 95 टक्के - सरासरीपेक्षा कमी पाऊस
- 96 ते 104 टक्के - सरासरीइतका पाऊस
- 105 ते 110 टक्के - सरासरीपेक्षा जास्त पाऊस
- 110 टक्क्यांपेक्षा जास्त - सर्वाधिक पाऊस
मान्सून 1 जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकणार
सर्वसाधारपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसा मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो. यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अल निनो म्हणजे काय?
अल निनो हा हवामानाचा नमुना आहे. यामध्ये समुद्राचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते. त्याचा परिणाम १० वर्षांतून दोनदा होतो. त्याच्या प्रभावामुळे, जास्त पाऊस असलेल्या भागात कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस पडतो. एल निनोमुळे भारतात मान्सून अनेकदा कमकुवत असतो. ज्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.












Click it and Unblock the Notifications