WhatsApp चे 'डिलीट' केलेले मेसेज वाचता येणार! कोणत्याही ॲपशिवाय जाणून घ्या अँड्रॉइडची ही गुप्त ट्रिक
How to Read Deleted WhatsApp Messages on Android Without Any App 2026 : व्हॉट्सॲपवर कोणाचा तरी मेसेज येतो आणि तुम्ही तो वाचण्यापूर्वीच समोरची व्यक्ती तो 'Delete for Everyone' करते, तेव्हा नेमका काय मेसेज असेल ही उत्सुकता सर्वांनाच असते. आतापर्यंत असे मेसेज पाहण्यासाठी लोक थर्ड-पार्टी ॲप्सचा वापर करत असत, जे सुरक्षित नसतात. पण, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या Android फोनमध्येच एक असा छुपा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही हे डिलीट केलेले मेसेज सहज वाचू शकता.

काय आहे ही 'Notification History' ट्रिक?
हे व्हॉट्सॲपचे फिचर नसून अँड्रॉइड सिस्टमचे एक इनबिल्ट फिचर आहे. जेव्हा कोणी तुम्हाला मेसेज पाठवते, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येते. जरी मेसेज व्हॉट्सॲपवरून डिलीट झाला, तरी तुमच्या फोनच्या नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये त्याची नोंद राहते.
डिलीट मेसेज पाहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- १. तुमच्या फोनच्या Settings मध्ये जा.
- २. Notifications या पर्यायावर क्लिक करा.
- ३. खाली स्क्रोल करून Advanced Settings किंवा थेट Notification History वर टॅप करा.
- ४. 'Notification History' चा टॉगल ON करा.
आता इथून पुढे जो कोणी मेसेज डिलीट करेल, तो तुम्ही या हिस्ट्रीमध्ये जाऊन कधीही वाचू शकता.
या पद्धतीच्या काही मर्यादा:
केवळ टेक्स्ट मेसेज: तुम्ही फक्त मजकूर वाचू शकता. फोटो, व्हिडिओ किंवा व्हॉईस नोट्स येथे दिसत नाहीत.
आयफोनमध्ये उपलब्ध नाही: हे फिचर सध्या फक्त अँड्रॉइड युजर्ससाठीच आहे.
मर्यादित शब्द: जर मेसेज खूप मोठा असेल, तर तो पूर्ण दिसणार नाही.
सुरक्षेचा सल्ला: नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन केल्यावर तुमचे OTP आणि खाजगी नोटिफिकेशन्सही तिथे सेव्ह होतात. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित ठेवणे तुमच्याच हातात आहे.












Click it and Unblock the Notifications