Holi 2025 Bank Holiday : होळी निमित्त 4 दिवस बँका बंद राहणार, कोणत्या राज्यात कधी सुट्टी, घ्या जाणून
Holi 2025 Bank Holiday : सणा-सुदीच्या या काळात बँका अनेकदा बंद असतात, परंतु काही शहरांमध्ये बँका खुल्या राहतात. 13 आणि 14 मार्च 2025 रोजी होळीनिमित्त विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. जर तुम्हाला बँकेत काही तातडीचे काम असेल तर प्रवासापूर्वी तुमच्या राज्यात बँका कधी बंद आहेत हे जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार 2025 मध्ये होळीच्या दिवशी बँकांना सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील.

13 मार्च 2025 रोजी कोणत्या राज्यात बँका बंद राहतील?
13 मार्च रोजी होलिका दहननिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील. हा दिवस "छोटी होळी" म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
14 मार्च 2025 रोजी कोणत्या राज्यात बँका बंद राहतील?
14 मार्च 2025 रोजी होळीच्या मुख्य सणानिमित्त महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड तसेच इतर अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये गुजरात, ओडिशा, चंदीगड, सिक्कीम, आसाम, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगर यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये दोन दिवसांची सुट्टी
उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 13 आणि 14 मार्च 2025 रोजी दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये ही सुट्टी फक्त एका दिवसासाठी असेल, जी प्रादेशिक परंपरांनुसार ठरवली जाईल.
15 मार्च रोजी बँका उघडतील की नाही?
15 मार्च रोजी महिन्याचा तिसरा शनिवार असल्याने बहुतेक राज्यांमध्ये बँका खुल्या राहतील, कारण हा दिवस कामकाजाचा दिवस असतो. दरम्यान त्रिपुरा, ओडिशा आणि मणिपूर सारख्या काही राज्यांमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
ऑनलाइन सेवांवरही परिणाम होईल का?
होळीमुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो, परंतु ऑनलाइन बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध असतील. जर तुमचे बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते सुट्ट्या लक्षात घेऊन पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो.
मार्च 2025 मधील इतर सुट्ट्या
8 मार्च (दुसरा शनिवार) आणि 9 मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
22 मार्च (चौथा शनिवार) आणि 23 मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी आणि बिहार दिन
27 मार्च (गुरुवार): शब-ए-कद्र (जम्मूमध्ये बँका बंद)
28 मार्च (शुक्रवार): जुमात-उल-विदा (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)
30 मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
31 मार्च (सोमवार): रमजान-ईद (ईद-उल-फित्र), बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.












Click it and Unblock the Notifications