Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

होळीचा सण लय भारी! तुमच्या मित्र-कुटुंबांसह नातेवाईकांना होळीसाठी काय द्याल खास गिफ्ट?, जाणून घ्या

How to Choose Perfect Holi Gift for Friends family : होळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. तो साजरा करण्यासाठी सर्वजण आतुरतेणे वाट पाहत आहेत. रंगांची उधळण करुण हा आनंदोत्सव साजरा केला जातो.

होळीनिमित्त तुम्ही तुमच्या आप्तस्वकियांना काही विशेष भेट देखील देऊन आनंद अधिक द्विगुणित करू शकता. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना तुमच्या मित्रांना काय सुंदर भेट देऊ शकता याबाबत देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...!

खालील काही वस्तूंचा विचार तुम्ही प्रामुख्याने करू शकता. चला तर जाणून घ्या सविस्तर..!

आरोग्यदायी व उत्तम नाष्टा

होळी म्हणजे रंगांशी खेळताना स्वादिष्ट पदार्थ खाणे आणि जवळच्या आणि प्रियजनांसोबत आनंदोत्सव साजरा करणे असते. जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असलेल्या एखाद्याला भेट देत असाल तर हेल्थ फूड असलेले खास होळी हॅम्पर का निवडू नये? हे चांगले आरोग्य आणि चव यांच्यातील संतुलन ठेवेल.

Holi 2025

हर्बल रंगाची द्या भेट

होळीसाठी तुमच्या प्रियजणांना चमकदार आणि उत्साही रंग भेटवस्तू देण्यापेक्षा चांगली प्रतीकात्मक भेट काय असू शकते? तुम्हाला प्रतिष्ठित ऑनलाइन भेटवस्तू देणाऱ्या वेबसाइट्सवर निवडण्यासाठी हर्बल आणि ऑरगॅनिक गुलाल पॅक देखील तुम्ही देऊ शकता. अर्थातच, रंगामुळे त्यांच्या स्किनवर कोणताही परिणाम होणार नाही, याची जाणीव देखील त्यांना होणार आहे.

विविधरंगी फुलांचे पुष्पगुच्छ

सुंदर फुलांचे पुष्पगुच्छ देऊन तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही होळीनिमित्त खरं सरप्राईज देऊ शकता. गुलाबांपासून कार्नेशन आणि ऑर्किडपर्यंत अनेक प्रकारच्या फुलांची भेट देऊ शकता. या काळात वसंत ऋतूचे आगमन झाल्याने मोठा फायदा होणार आहे.

हे ही वाचा : Holi Health Tips : होळी खेळताना चुकून रंग तुमच्या डोळ्यात गेला तर लगेच करा 'या' 3 गोष्टी

उत्तम मिठाईची देऊ शकता भेट

होळीनिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाईकांना म्हणा किंवा मित्रपरिवाराला गोड मिठाई देखील भेट देऊ शकता. तुम्ही त्यांना स्वतंत्र भेटवस्तू म्हणून निवडू शकता किंवा तुमच्या प्रियजनांसाठी क्युरेटेड होळी हॅम्परमध्ये जोडू शकता. त्यामुळे त्यांचा आनंद अधिक द्विगुणित होऊ शकतो.

चॉकलेटसह इतर गुडीज

तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गोड पदार्थांना चॉकलेट भेट देऊ शकता अनेक आकर्षक हॅम्पर आहेत. तसेच, तुमच्या भेटवस्तूंच्या गरजांसाठी तुम्ही विचारात घेऊ शकता असे गोड आणि चवदार बॉक्स आहेत. ते एका अर्थाने संपूर्ण पॅकेज आहेत! चॉकलेट ट्रफल गिफ्ट बॉक्स देखील होळीच्या सणासाठी आनंददायी ठरू शकते.

हे ही वाचा : चक्क चितेच्या राखेने खेळली जाते 'ही' होळी, काय आहे' मसन होळीचा' इतिहास

व्यक्तिगतरित्या कशी देऊ शकता भेट

होळी सणासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला किंवा अन्य सर्वांना होळीसाठी विशेष भेट देऊ शकता. काही वैयक्तिक भेट देखील देऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मित्राला त्याचा एकदा चांगला सुंदर फोटो बनवून देऊ शकतात. आठवण म्हणून ग्रुप फोटो देखील चांगल्या पद्धतीने बनवून घरात लावण्यासाठी देऊ शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+