फक्त चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणं हा गुन्हा नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय
फक्त ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफिक मटेरियल पाहणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहे.
ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी पाहिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी होस्कोटे येथील एन इनायतुल्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ती रद्द करण्याचे आदेश दिले असल्याने आरोपी पुरुषाला दिलासा मिळाला आहे.
..त्यामुळे हा गुन्हा नाही
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67B अंतर्गत, एखाद्या व्यक्तीवर बाल पोर्नोग्राफी सामग्री तयार करणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. परंतु याचिका कर्त्याने अश्लील वेबसाइट पाहिली होती आणि ती सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित केली नव्हती, त्यामुळे कलम 67B अंतर्गत तो गुन्हा नाही, त्या अंतर्गत लागू होत नाही,असे खंडपीठाने निदर्शनास आणले.
याचिकाकर्त्यावर चुकुन गुन्हा नोंद
न्यायालयाने पुढे नमूद केले की याचिकाकर्त्याने अश्लील व्हिडिओ पाहिला होता परंतु त्याच्यावर आणखी काहीही आरोप केलेले नाहीत. त्यामुळे याचिकाकर्त्यावर चुकून गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो पुढेही चालू राहिला तर तो कायद्याचा गैरवापर ठरेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
23 मार्च 2023 रोजी सदरच्या याचिकाकर्त्याने मोबाईलवर मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहिले होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने महिला आणि मुलांवरील लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू सिटी सीआयडी युनिटने बेंगळुरू सायबरला एक अहवाल पाठवला आहे.
या अहवालाची पडताळणी केल्यानंतर, अश्लील व्हिडिओ पाहणारी व्यक्ती इनायतुल्ला असल्याचे आढळून आले आणि त्याच्याविरुद्ध 3 मे 2023 रोजी बेंगळुरू सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67B अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. याचिकाकर्त्याने ही तक्रार रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, "याचिकाकर्ता हा पॉर्न ॲडिक्ट आहे, परंतु त्याचा कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड किंवा शेअर केलेला नाही. त्यामुळे हा खटला रद्द करण्यात यावा".
"याचिकाकर्त्याने कबूल केले आहे की त्याने लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहिले आहेत त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा" असा युक्तिवाद फिर्यादीने केला आहे












Click it and Unblock the Notifications