Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हेमंत सोरेन तिसऱ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री

मुंबई- झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रांची येथील राजभवनात हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यात झारखंड मुक्ती मोर्चासह अनेक मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.

Hemant Soren

हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी एका जमिनीवर कब्जा केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. अटकेपूर्वी सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. झारखंड उच्च न्यायालयाने 28 जून रोजी त्यांना जामीन मंजूर केला होता. सोरेन या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी दिसत नसल्याचे न्यायालयाचे म्हणणे होते.

झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या आमदारांमध्ये एकमत झाल्यानंतर तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परतले. हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर झारखंडचे हंगामी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी हेमंत सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. राज्यपालांकडून निमंत्रण मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर पाच महिन्यांपूर्वी जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. अटक होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपाई सोरेन यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. चंपाई सोरेन यांनी बुधवारीच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+