निसर्ग कोपला : 1000 हून अधिक पर्यटक अडकले; सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन, इशारा जारी!

Heavy rains in North Sikkim Update : उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लाचेन चुंगथांग रोडवरील मुनशिथांग आणि लाचुंग चुंगथांग दरम्यान लेमा/बॉब या मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. परिणामी प्रशासनाला रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सुमारे एक हजार पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे सुमारे 1000 पर्यटक आणि त्यांची वाहने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अडकली आहेत. परिस्थिती पाहता, उत्तर सिक्कीममधील मांगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.

Heavy rains in North Sikkim

मिळालेल्या माहितीनुसार, चुंगथांगचा रस्ता खुला आहे, परंतु मुसळधार पावसामुळे रस्ता चिखलाने भरलेल्याने तो निसरडा झाला आहे. या पलीकडे जाणारा रस्ता भूस्खलनामुळे बंद झाला आहे. म्हणून, उत्तर सिक्कीमला भेट देण्यासाठी सद्या परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचबरोबर आधीच जारी केलेले परवाने पुढील आदेशापर्यंत अवैध घोषित केले जातील. जर कोणी आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगितले गेले.

3 प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग प्रभावित

एसपी सोनम देचू भुतिया यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादानुसार, ज्या भागात भूस्खलन झाले त्या भागात सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे रस्ते दुर्गम झाले आहेत. खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि डोंगर कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन परवाना रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. भूस्खलनामुळे लाचेन, लाचुंग आणि युमथांग सारख्या पर्यटन स्थळांना जोडणारा रस्ता सद्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

प्रशासनाने जारी केला अलर्ट

भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीममधील लाचेन, लाचुंग आणि युमथांग यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर परिणाम झाला आहे. वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या हंगामात ही ठिकाणे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय असतात.

अधिकाऱ्यांनी पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना इशारा दिला आहे की त्यांनी या मार्गांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये कारण पुढे भूस्खलन किंवा रस्ते कोसळण्याचा धोका आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+