Haryana Assembly Election 2024 : राहुल गांधी खोटे बोलणारे मशीन, गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापतं चाललेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मंगळवारी हरियाणा दौऱ्यावर होते. भिवानी येथील लोहारू येथील सभेत त्यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी हे खोटे बोलणारे यंत्र आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. विदेशात जाऊन राहुल गांधी आरक्षण संपविण्याची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोहारू येथे पोहोचल्यावर अमित शहा यांचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि राज्यसभा खासदार किरण चौधरी यांनी स्वागत केले. या रॅलीत भाजपचे उमेदवार जेपी दलाल, राज्य निवडणूक सहप्रभारी बिप्लब देब, माजी मंत्री राम बिलास शर्मा आणि कुलदीप बिश्नोई हे देखील उपस्थित होते. यासभेनंतर शाह यांनी फरीदाबादच्या सेक्टर 12 मधील सभेला देखील संबोधित केले.

Amit Shaha

हरियाणाचे देशाला तीन गोष्टी दिल्या..

अमित शाह म्हणाले की, कॉंग्रेसने अग्निवीरचा चुकीचा प्रचार केला आहे. अग्निवीरांना 20 टक्के आरक्षण मिळेल व रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पुढे बोलताना शहा म्हणाले की, मी छोटी काशीला आलो असल्याचे अमित शहा म्हणाले. तेव्हा मला तुम्हाला सांगायचे आहे की हरियाणा हे दिसायला छोटे राज्य आहे. ते दिल्ली जवळ आहे. पण संपूर्ण देश हरियाणाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवतो. सर्वप्रथम मातृशक्तीला सलाम. कारण स्वातंत्र्यानंतर सर्व आघाड्यांवर सैनिक गेले. बहुतांश सैनिक हे वीर भूमी हरियाणाचे आहेत.

जेव्हा अन्नधान्य देशात आयात करावे लागत होते. देशाला गरज असताना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे कामही हरियाणातील शेतकऱ्यांनी केले. ऑलिम्पिक असो की पॅरा ऑलिम्पिक, भारताचे नाव जेव्हा टेबलमध्ये दिसते तेव्हा हरियाणा अव्वल स्थानावर असतो. हरियाणाने शूर सैनिक दिले. मजबूत खेळाडू दिले. देशाची भूक पृथ्वीच्या कुशीतून मिटवण्यासाठी हरियाणाने शेतकऱ्यांना अन्नधान्यही दिले आहे. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी या तिन्ही भागात खेळाडू, सैनिक आणि हरियाणातील तमाम जनतेसाठी विकास कामे केली आहेत.

निवडणुकीनंतर दहशतवाद्यांना सोडण्याचा अजेंडा

ते म्हणाले की, काश्मीरमध्ये निवडणुका सुरू आहेत. राहुल गांधींनी तिथे जाऊन ओमर अब्दुल्ला यांच्याशी तोडगा काढला. निवडणुकीनंतर सर्व दहशतवाद्यांना सोडू, असा त्यांचा अजेंडा आहे. पाकिस्तानशी चर्चा करणार. दहशतवादाच्या प्रतिबंधित संस्थांवरील बंदी उठवेल. त्यांनी राहुल गांधींना इशारा देत म्हणाले, ऐक राहुल बाबा, वर नरेंद्र मोदी बसले आहेत. तुमचे सरकार नाही. जोपर्यंत भाजपचे सरकार आहे. काश्मीरकडे कोणीही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+