हरियाणात निवडणूक; उद्या 90 जागांसाठी मतदान, एक हजार उमेदवारांचे भविष्य होणार 'सिलबंद'
Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. हरियाणात ९० मतदारसंघांसाठी उद्या एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ३१ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. राज्यातील २ कोटी ३ लाख ५४ हजारांहून अधिक मतदार उभ्या असलेल्या उमेदवारांचं भविष्य ठरवतील. या निवडणुकीसाठी एकूण २० हजार ६३२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभा
या निवडणुकीची चर्चा देशभर झाली. काँग्रेस व भाजप दोघांनीही जोरदार प्रचार केला. भाजपचे केंद्रातील अनेक नेते हरियाणामध्ये प्रचारासाठी आले होते. मतदारांना यो दोन्ही पक्षांनी भरपूर आश्वासने दिली. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे भाजपचे पहिल्या फळीतील नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता.
काँग्रेसनेही लढवला ताकदीने किल्ला
काँग्रेसने या निवडणुकीत जोरदार प्रचार केला. रणनिती बदलून काँग्रेसने भाजपला बुचकळ्यात टाकलं होतं. हरियाणातील जाट या प्रमुख समुहाने काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा किती फायदा होतो, हे निकालानंतर कळेल. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संवाद यात्रेच्या माध्यमातून हरियाणा पिंजून काढले होते. हरियाणात राहुल गांधींनी तीन दिवस यात्रा केली होती. काँग्रेसने या निवडणुकीतही संविधान बचाओ हा नारा दिला.
काँग्रेस व आपचा वेगवेगळ्या चुली
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व आप येथे एकत्र लढले होते. मात्र आता विधानसभेला हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल की अन्य कुणाला, हेही निकालानंतरच कळेल. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनीही जोरदार प्रचार केला. उद्या एकाच टप्प्यात 90 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.












Click it and Unblock the Notifications