Haryana Election : जेव्हा काँग्रेस अडचणीत येते तेव्हा त्यांना दलितांची आठवण होते- मायावतींचा निशाणा
Haryana Assembly Election 2024 : जेव्हा काँग्रेस अडचणीत येते तेव्हा त्यांना दलितांची आठवण होते अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. यासह दलित नेत्यांचे काँग्रेसमध्ये शोषण होत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात एक पोस्ट त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी एक ठोस भूमिका घेत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी दलित नेत्यांना काँग्रेस आणि इतर जातीवादी पक्षांपासून दूर राहण्यचा सल्ला दिला तसेच डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

मायावतींची टीका
एक्सवर प्रामुख्याने टीका करताना मायावती यांनी दलित नेत्यांचे शोषण करण्यासाठी काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, की काँग्रेससकट हे पक्ष संकटाच्या वेळीच दलितांना मुख्य पदांवर नियुक्त करतात आणि परिस्थिती स्थिर झाल्यावर त्यांना हाकलून देतात.
...तेव्हा दलित नेत्यांकडे दुर्लक्ष
मायावतींनी हेही पोस्टमध्ये लिहिले की, 'देशात आजवर घडलेल्या राजकीय घडामोडींवरून हे सिद्ध होते की, विशेषत: त्यांच्या वाईट दिवसांत काँग्रेस आणि इतर जातीयवादी पक्षांनी काही काळ दलितांना मुख्यमंत्रिपद आणि संघटनेत इत्यादी महत्त्वाच्या पदांवर ठेवले हे त्यांचे गरजेपुरते धोरण आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी त्यांच्या चांगल्या दिवसात दलित नेत्यांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या जागी जातीयवादी लोकांना बसवले, असे हरियाणा राज्यात दिसून येत आहे.
अशा पक्षांपासून दुर रहा
अशा प्रकारे अपमानित होत असलेल्या दलित नेत्यांनी त्यांचे तारणहार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा अवलंब करायला हवा. त्यांनीच अशा पक्षांना विरोध करायला सुरुवात केली होती. त्यामुळे नेत्यांनी अशा पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी पुढे यावे.












Click it and Unblock the Notifications