या प्रेमाने भरलेल्या शुभेच्छा संदेशांने व्हॅलेंटाईन डे खास बनवा, तुमचा जोडीदार वाचताच प्रेमात पडेल
Valentines Day 2025 Wishes : फेब्रुवारी महिन्यातील सर्वात खास दिवस आला आहे! व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक सुंदर क्षणानंतर अखेर तो दिवस आला आहे, ज्याची प्रत्येक प्रेमीयूगूल आतुरतेने वाट पाहत असतो. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या भावना व्यक्त करू शकला नसाल, तर ही योग्य संधी आहे.
तुम्ही संकोच आणि भीती बाजूला ठेवा आणि तुमचे प्रेम व्यक्त करा. जर तुम्हाला शब्दच अपुरे पडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रोमँटिक संदेश घेऊन आलो आहोत..

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तू जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे...
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे
प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
Happy Valentine Day
तुझं माझं नातं असं असावं जे
शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं
Happy Valentine Day

प्रेमाची जादूने तुझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा
फक्त आजच नाही तर दररोज भरू दे
आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही
प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे
कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही
तर ही जन्मोजन्मीची राहू दे.
Happy Valentine day
बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं.
Happy Valentines Day

डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!!
Happy Valentine Day
तुझ्याशी बोलताना काळ थांबावा
क्षण हे सोनेरी हृदयात राहावा
तुझ्या प्रेमात मी हरवून जातो
साऱ्या जगाला विसरून जातो
Happy Valentine Day












Click it and Unblock the Notifications