Teddy Day 2025: टेडी डे च्या खास दिवशी तुमच्या जोडीदाराला हे हृदयस्पर्शी संदेश पाठवा
Teddy Day 2025 Wishes and Quotes: आज म्हणजेच 10 फेब्रुवारी 2025 हा व्हॅलेंटाईन डे आठवड्याचा चौथा दिवस आहे. हा दिवस टेडी डे म्हणून ओळखला जातो. तुमच्या जोडीदाराला टेडी भेट देण्यासाठी हा दिवस परिपूर्ण मानला जातो. विशेषतः प्रियकराने त्याच्या प्रेयसीला नक्कीच टेडी भेट द्यावी.
टेडी बेअर भेट देऊन तुमचे प्रेम व्यक्त करा. प्रत्येक मुलीला टेडी बेअर खूप आवडतात. तसेच, ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहते जेणेकरून तिला एक गोंडस टेडी मिळेल. टेडी डे ला, एक गोंडस सॉफ्ट टॉय भेट देऊन प्रेम व्यक्त करता येते. टेडी बेअर खूप गोंडस असतात आणि ते कोणाचेही मन जिंकू शकतात.

टेडीसह प्रेमळ संदेश पाठवा - जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला टेडी डे सह खास इम्प्रेस करायचे असेल तर तुम्ही त्याला टेडीसह काही प्रेमळ संदेश पाठवू शकता. यामुळे त्यांना आनंद तर मिळेलच पण तुमचे नातेही अधिक घट्ट होईल.
-टेडी बेअर हे फक्त एक खेळणे नाही तर प्रेम आणि आठवणींची एक सुंदर भावना आहे. जर तुम्हाला तुमच्या क्रशला, जोडीदाराला किंवा जिवलग मित्राला खास बनवायचे असेल, तर एक गोंडस टेडी भेट द्या आणि त्यासोबत एक हृदयस्पर्शी संदेश पाठवा.
जेव्हा तुझी आठवण येते
तू दिलेल्या टेडीला मिठीत घेते
हॅपी टेडी डे
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
हॅपी टेडी डे
तु सदैव हसत रहा
आनंदी रहा
खुश रहा
मात्र सदैव टेडी बिअर सारखे
माझ्या सोबत रहा
हॅपी टेडी डे
एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं
हॅपी टेडी डे
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू
हॅपी टेडी डे
तू नेहमी माझ्या विचारांमध्ये
माझ्या स्वप्नांमध्ये आणि माझ्या हृदयात आहेस.
मी कुठेही गेलो तरी तू नेहमी माझ्या जवळ असशील.
हॅपी टेडी डे
जेव्हा मी त्याला मिठी मारतो
तेव्हा माझा टेडी मला तुझी आठवण करून देतो.
ते तुझ्यासारखेच मऊ आणि उबदार आहे.
टेडी डे 2025 च्या शुभेच्छा!
या खास दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे.
टेडी डे 2025 च्या शुभेच्छा!
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हॅपी टेडी डे
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
हॅपी टेडी डे












Click it and Unblock the Notifications