Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy Raksha Bandhan 2025 Wishes : तुमच्या बहिणीला द्या राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा! हे 10 मॅसेज वाचा

Happy Raksha Bandhan 2025 Wishes for Sister : ताई, दिदी, तायडे.. अक्का ही जी नावं आहेत ती बहिणीसाठी असलेली नावं आहेत. या नावात प्रेम आणि सारे विश्व सामावलेले असते. जी ताई लहान तिच्यासाठी भाऊ म्हणजे आकाशाऐवढा मोठा जो भाऊ लहान त्याच्यासाठी ताई तर पृथ्वीएवढी कारण ती आईनंतरची दुसरी सावली असते जी आपल्या भावांवर जीवापाड प्रेम करते.

आई मार देताना मध्ये पडणारी ताई असते, वडिल जर काही आपल्याला रागवत असतील तर आपली वकिली करणारी ताईच असते ..अन् जेव्हा ती सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा जगातलं सर्वात मोठं दुःख आपल्यालाच होतं कारण मायेचा सागर आपल्यापासून दूर जात असतो. तिचा नेहमीचा सहवासही हरवणार असतो.

Happy Raksha Bandhan 2025 Wishes

अशा अनेक ताई आता भावांपासून दूर सासरी राहत आहेत आणि भाऊ त्यांच्याकडे राखीपौर्णिमेसाठी जात असतो. असा एकही क्षण नसतो जेव्हा आपल्या सर्व संकट आणि आनंदात ताईची आठवण येत नाही, ती सतत आपल्याला उभारी आणि प्रोत्साहन देते म्हणूनच या ताईला धन्यवाद देण्यासाठी आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास १० संदेश देत आहोत. जे तुमचे आणि तुमच्या बहिणीच्या प्रेमाला वृद्धींगत करेल.

राखीपौर्णिमा बहिणीसाठी शुभेच्छा संदेश मराठीत (Happy Raksha Bandhan 2025 Wishes for Sister in Marathi)

1. "माझी बहीण प्राणापेक्षाही प्रिय आहे, ती गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही नाजूक आहे. ती आकाशातून उतरलेली परी आहे, खरे सांगायचे तर माझी बहीण माझ्या कुटुंबातील राजकुमारी आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा प्रिय बहीण!!"

2. "माझ्या प्रिय ताई, तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, तुझ्या प्रेमाने माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा सुगंधाने भरून टाकला आहे, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!"

3. "कधी ती आपल्याशी भांडते, कधी ती आपल्याशी वाद घालते, पण तरीही बहिणीकडे न बोलता सर्व काही समजून घेण्याची एक खास कला आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!! ताई"

बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे संदेश (Happy Raksha Bandhan 2025 Wishes for Sister)

4. "आपल्याला आपलं बालपण आठवतं, ते भांडण, ते वाद आणि नंतर पुन्हा एकत्र येणं... हेच भाऊ-बहिणीचं प्रेम आहे आणि रक्षाबंधनाचा सण हे प्रेम अधिक वाढवण्यासाठी आला आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!"

5. "आम्ही एकत्र मोठे झालो आणि बालपणी खूप मजा केली. राखीचा सण आपल्याला या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी येतो.!!"

प्रेम आणि आशीर्वादांनी भरलेले संदेश (Happy Raksha Bandhan 2025 Wishes for Sister in Marathi)

6. "सूर्यासारखे चमकत राहा, फुलांसारखे सुगंधित राहा, आज या भावाची हीच प्रार्थना आहे की, तुम्ही नेहमी आनंदी राहा. भावाकडून बहिणीला राखीच्या हार्दिक शुभेच्छा!!"

7. "जर मला प्रत्येक आयुष्यात एक बहीण मिळाली, तर ती तूच असावीस. तू गोड आहेस, तू खास आहेस. तुझे आयुष्य एका सुंदर कथेसारखे बनो. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय तायडे!!"

8. "हा क्षण काहीतरी खास आहे, कारण भावाचा हात बहिणीच्या हातात आहे. अरे माझ्या बहिणी, तुझ्या आनंदासाठी मी नेहमीच तुझ्यासोबत आहे." रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिदी.!!

9. फुलो का तारो का सबका कहना हैं. एक हजारो में मेरी बहणा हैं.. सारी उमर हमे संग रहना हैं.. हॅपी रक्षाबंधन ताई!!

10. आईनंतर आपली मायेसारखी काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे ताई! या ताईत मी आईचे रुप पाहतो. ताई तुला दिर्घायुष्य लाभो.. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+