Happy New Year 2026 Wishes in marathi : नवीन वर्षानिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Happy new year 2026 wishes in marathi : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन सुरुवातीची संधी! अशा या शुभप्रसंगी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना शुभेच्छा देऊन नात्यात गोडवा निर्माण करणे ही आपली परंपरा आहे. तुमच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, खास मराठी शुभेच्छा संदेश, व्हॉट्सॲप स्टेटस आणि कोट्स, जे तुमचे नवीन वर्ष अधिक आनंदमयी बनवतील!

नवीन वर्षासाठी ३० खास शुभेच्छा संदेश (Marathi Wishes)
नातेवाईकांसाठी शुभेच्छा
- नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेसह तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जुन्या आठवणींना मागे सारून, नवीन स्वप्नांचा पाठलाग करूया. २०२६ वर्ष तुम्हास सुखकारक जावो.
- आई-बाबा, तुमच्या आशीर्वादाने माझे नवीन वर्ष अधिक सुंदर होईल. आपणास नूतन वर्षाभिनंदन!
- हे नवीन वर्ष तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आणि मनात आनंदाचा झरा घेऊन येवो.
- सर्व मोठ्यांना माझा नमस्कार, हे नवीन वर्ष सर्वांना उत्तम आरोग्याचे जावो.
मित्रांसाठी खास संदेश
- सरत्या वर्षाला करूया बाय-बाय, २०२६ मध्ये करूया नवीन हाय! हॅप्पी न्यू इयर मित्रा!
- नवीन वर्षात नवी पार्टी, नवी मजा आणि आपले जुनेच घट्ट नाते! २०२६ च्या शुभेच्छा!
- २०२५ मध्ये जे काही राहून गेलं, ते २०२६ मध्ये नक्की पूर्ण होईल, असा विश्वास ठेव. शुभेच्छा!
- तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत आणि प्रगतीची दारे उघडली जावोत.
- नवीन वर्षात नवीन ध्येय गाठूया, सोबत राहून स्वप्ने पूर्ण करूया!
प्रेमळ आणि प्रेरणादायी शुभेच्छा
- प्रत्येक दिवस एक नवीन पान आहे, २०२६ मध्ये एक सुंदर गोष्ट लिहा! नववर्षाच्या शुभेच्छा!!
- उद्याची नवी पहाट, सुखाची नवी लाट, २०२६ वर्ष तुमची बदलून टाकेल वाट!
- यश तुमच्या चरणी असो, आनंद तुमच्या मनी असो. नूतन वर्षाभिनंदन!
- ध्येय तुमचे उंच असू दे, यशाचे शिखर जवळ असू दे. २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- २०२६ मध्ये तुमचे आयुष्य गुलाबासारखे टवटवीत आणि साखरेसारखे गोड असावे.
सोशल मीडिया / व्हॉट्सॲप स्टेटससाठी
- नवा दिवस, नवी आशा, नवीन वर्षाची नवी दिशा! Happy New Year 2026
- २०२६ मध्ये 'आनंद' हाच आपला परमनंट स्टेटस असावा!
- लोड कमी, आनंद जास्त... २०२६ मध्ये व्हा फक्स्त मस्त!
- सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाचे स्वागत... नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- प्रगतीचे नवे शिखर गाठूया, २०२६ दणक्यात साजरे करूया.
लहान आणि गोड संदेश
- सुख, शांती आणि समाधान! हेच मिळो तुम्हाला दान. शुभेच्छा!
- २०२६ वर्ष तुमच्यासाठी लकी ठरो!
- दु:खाचा विसर पडो, आनंदाची लाट चढो. हॅप्पी न्यू इयर! २४. चला, नवीन वर्षाचे स्वागत हसून करूया!
- २०२६ - स्वप्ने पूर्ण करण्याचे वर्ष!
- शुभ नववर्ष! तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरोत.
- आपणास आणि आपल्या कुटुंबास २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा.
- नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने करा, प्रगती नक्की होईल.
- सुवर्ण क्षणांची नवी भेट, २०२६ मध्ये सुख असो थेट!
- २०२६ च्या गोड गोड शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications