Happy Navratri 2025 wishes Marathi आजपासून नवरात्रीला सुरुवात, खास शुभेच्छा संदेश, स्टेट्स शेअर करा
Happy Navratri 2025 wishes in Marathi : देशभरात आजपासून नवरात्रीची धुम आहे, आजपासून आदिशक्तीच्या उत्सवाला, म्हणजेच नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा हा सण शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे. या शुभप्रसंगी लोक माता राणीची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात. आज महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी पुर्ण पीठ असलेल्या माहुर देवीची घटस्थापना झाली असून, तुळजापूरची तुळजाभवानी आई, वणीची सप्तश्रृंगी देवीचीही विधीवत पुजा करण्यात आली. आज घरोघरी घटस्थापना होत आहे.
घटस्थापनेसोबतच देवीची आराधना आणि पुजाविधी करुन नवरात्रीच्या या पवित्र सणाला सुरुवात झाली आहे. आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रीच्या सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून हा सण अधिक अविस्मरणीय बनवू शकता.

नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश (Shardiya Navratri 2025 Wishes)
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माता दुर्गा तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
'जोर से बोलो, जय माता दी', मातेच्या भक्तीने तुमचे आयुष्य उजळून निघो आणि प्रत्येक दिवस नवीन ऊर्जा व उत्साहाने भरलेला असो.
नवरात्रीचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर करून आनंदाची भेट घेऊन येवो. हॅपी वाली नवरात्री!
नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा (Shardiya Navratri 2025 Wishes)
देवीची ज्योत तुमच्या घराला आणि अंगणाला प्रकाश देवो आणि आयुष्याला नवीन दिशा मिळो. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
माता दुर्गेची नऊ रूपे तुमच्या आयुष्यात शक्ती, बुद्धी, आरोग्य, प्रेम आणि समृद्धीचा संचार करोत. शुभ नवरात्री!
नवरात्री निमित्त विशेष शुभेच्छा संदेश (Happy Shardiya Navratri 2025)
शक्तीचा सण आहे नवरात्री,
भक्ती आणि प्रेमाची सोबत आहे नवरात्री.
अंबे माता सर्वांचे रक्षण करो.
चोळा लाल, मैय्या का चोळा लाल-लाल, शुभ नवरात्री!
मातेच्या चरणांवर डोकं टेकवा, हॅपी वाली नवरात्री!
आनंदाचा सण आहे नवरात्री, तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा!
मातेच्या भक्तीने आयुष्य सुधारते,
दुर्गेच्या आशीर्वादाने मनोबल वाढते,
हॅपी वाली नवरात्री!
मातेच्या कृपेने सुख-समृद्धी मिळते,
नवरात्रीत प्रत्येक घर प्रकाशमय होते.
'अंबे तू है जगदंबे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुन गांवे भारती', हॅपी वाली नवरात्री!
Disclaimer: या लेखाचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यतांवर आधारित आहे. कोणतीही माहिती अंमलात आणण्यापूर्वी, कृपया जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या.
हेही वाचा : Shardiya Navratri 2025 Wishes in Marathi : नवरात्रीसाठी टाॅप 30 मराठी शुभेच्छा संदेश, वाचा अन् पाठवा












Click it and Unblock the Notifications