Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Independence day 2024 Wishes: स्वातंत्र्यदिननिमित्त तुमच्या प्रियजनांना हे हृदयस्पर्शी संदेश पाठवा

Independence day 2024 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 2024 शुभेच्छा: भारत आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अबाधित ठेवण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं. शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणासह देशभक्तिपर कार्यक्रम ठेवले जातात स्वातंत्र्य दिन हा केवळ एक सण नाही तर हा दिवस आपल्याला त्या हुतात्म्यांची आठवण करून देतो ज्यांच्या बलिदानामुळे हा दिवस संपूर्ण भारतीय जनतेसाठी वरदान ठरला आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे सर्वज्ञात आहे, हा दिवस आपल्याला एकता, शांतता आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो.

happy independence day

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा,मेसेज आणि कोट्स

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख...
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
हॅपी 15 ऑगस्ट...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!

ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!

भारताच्या इतिहासाचा सन्मान राखून,
देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊ.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आपले कर्तव्य ओळखू,
आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.
जय हिंद!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात
आपल्या देशाचा गौरव राखूया.
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून निभावूया.
जय हिंद!
भारताच्या स्वातंत्र्याच्या गौरवमयी क्षणी
आपण सर्व देशभक्तांना अभिमानाने सलाम करूया.
शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी
आपल्या देशाचा सन्मान राखूया.
जय हिंद!

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशासाठी लढलेल्या शूरवीरांना शतशः प्रणाम करूया.

आपल्या भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करूया.
देशभक्तीचे सन्मान राखू
एकत्रितपणे भारताचा उज्ज्वल भवितव्य घडवू.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला, देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊ.

जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो
तो माझा भारत देश आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश,
देता सदा सर्वदा...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण...
वंदे मातरम्...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा...
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा...
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी...
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे...
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर...
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

'वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !'

आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल,
शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल,
आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा...
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे,
संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे.
वंदे मातरम्, भारत माता की जय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+