Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड अन् तुमच्या जवळच्या व्यक्तीला द्या मराठीत हटके खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday 2025 Wishes : आपल्या मित्र- मैत्रीणीला सहका-यांना वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर भन्नाट स्टेटस ठेवतो. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील त्यांचे फोटो शेअर करतो. तसंच त्यांना पर्सनली खास मेसेज आणि इमोजी पाठवतो.आपल्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती खास असते. मग त्यासाठी पैश्याची गरज पडत नाही. त्यासाठी पुरेसे आहेत फक्त दोन शब्द प्रेमाचे. ती खास व्यक्ती तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहते. तुम्हाला आधार देते. तुमच्या चुका सांगून तुम्हाला वाईट मार्गावर जाण्यापासून रोखते.

तुमच्या तुमच्या चांगल्या वाईट काळाचे साक्षीदारही हेच खास व्यक्ती असतात. जेव्हा तुमच्यावर एखादं संकट आलं तर तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातात. तुमचा वाढदिवस असेल तर तुमच्यासाठी काहीतरी खास सरप्राईज करतात. मग जर जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याला खास शुभेच्छा दिल्याचं पाहिजेत.

Birthday Wishes

परंतु वाढदिवस जेव्हा आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा बायकोचा असतो तेव्हा त्यांना नेमका काय मेसेज करावा असा प्रश्नच पडतो. मात्र आता याबाबत अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कारण इथं आम्ही तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा देणार आहोत. जेणेकरुन तुमची खास व्यक्ती शुभेच्छा संदेश वाचून तुमच्यावर इम्प्रेस होईल.

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल...
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा My Love

Birthday Wishes

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!

तुझी माझी साथ ही जन्मा-जन्माची असावी
माझ्या शेजारी उभी राहून तू बायको माझी शोभावी
माझी ही प्रार्थना देवाने पूर्ण करावी
जन्मोजन्मी मला तूच भेटावी.
(तुमच्या प्रिय व्यक्तीचं) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा...

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे
व आयुष्यभर तू माझ्याबरोबर असावे हीच माझी इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Sweetheart

Birthday Wishes

ज्या दिवशी तुला प्रथम पाहिले
आजही तो दिवस मला लख्ख आठवतो
माझ्या मनाच्या वाळवंटामध्ये
तुझ्या रूपाने जणू गुलाबाची कळी फुलली!
Happy Birthday My Love

आकाशात हजारो तारे असतील पण चंद्रासारखे कोणीच नाही
लाखो सुंदर चेहरे दिसतात रोज पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

तुझ्यावर रुसणं
रागावणं मला कधी जमलच नाही
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी सगळी स्वप्ने, इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Birthday Wishes

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
तुझ्यापासून होते आणि शेवट तुझ्याच नावाने होतो
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
नेहमीच सगळ्यात खास राहील.
Happy Birthday Dear

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जगातील सगळ्यात सुंदर
सगळ्यात गोड आणि सगळ्यात निरागस मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू मला मिळालीस यासाठी
ईश्वराचे मी मानावे तेवढे आभार कमी आहेत.
Happy Birthday My Love

माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर!
Happy Birthday My Love

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+