धक्कादायक! हॉस्पिटलमधून महिलांचे खाजगी व्हिडिओ लीक; यूट्यूब अन् टेलिग्रामवर व्हायरल
Private videos leaked : हाॅटेल्स, चेंजिंग रुममधील व्हिडिओ लिक झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत, पण चक्क हाॅस्पिटलमधून महिलांचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक झाल्याच्या घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुजरातमधील प्रसूती रुग्णालयात घडली आहे.
गंभीर बाब म्हणजे गर्भवती महिलांचे खासगी व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या गोपनीयतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तविक, गुजरातमधील राजकोटमधील एका खासगी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज लीक झाले असून त्यात महिला रुग्णांचे खासगी व्हिडिओ पाहिले जात आहेत. राजकोटमधील 'पायल मॅटर्निटी' हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागातून स्त्रीरोग तपासणी करणाऱ्या महिलांचे खाजगी व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या चॅनेल्सवर अनेक अश्लील कमेंट करण्यात आल्या असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज लीक झाले आहे का?
हा व्हिडिओ हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा हा व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर वेगाने फिरू लागला, तेव्हा तो अहमदाबाद सायबर सेलच्या निदर्शनास आला आणि त्याची चौकशी सुरू झाली. सायबर सेल हे व्हायरल व्हिडिओ डिलीट करत आहे पण या चॅनेलवर लाखो वेळा हे व्हिडिओ पाहिले गेले आहेत. या व्हिडिओमध्ये एक परिचारिका महिला रुग्णांना इंजेक्शन देताना आणि जाताना रुग्णाशी बोलताना दिसत आहे.
7 व्हिडिओ टेलिग्राम लिंकवर व्हायरल
7 व्हिडिओ टेलिग्राम लिंकवर व्हायरल झाले असून हॉस्पिटलची ही CCTV फुटेज क्लिप MBBS नावाच्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे. यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओची टेलिग्राम लिंकही देण्यात आली असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन ऑफरही देण्यात आली आहे. अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचचे एसीपी हार्दिक मकाडिया यांनी सांगितले की, या फिरणाऱ्या व्हिडिओचे यूट्यूब चॅनल एक वर्षापूर्वी जानेवारीमध्ये तयार करण्यात आले होते, तर टेलिग्राम चॅनल गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार करण्यात आले होते. युट्युबच्या वर्णनात दिलेल्या लिंक्सवरून ज्या टेलिग्राम चॅनलची जाहिरात केली जात आहे, त्यावर 90 पेक्षा जास्त लोक आहेत.
चेकअप रूममध्ये सीसीटीव्ही का?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रसूती रुग्णालयात रुग्णांच्या गोपनीयतेचे घोर उल्लंघन झाले आहे. गर्भवती महिलांची तपासणी केली जात असताना खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा काय उपयोग होता? अशा परिस्थितीत महिलांच्या गोपनीयतेची जबाबदारी कोणाची? या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे.












Click it and Unblock the Notifications