बाब्वोव ! सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ, सोन्याची काठी...कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा अलौकीक मुहुर्त साधण्यासाठी जगभरातून गर्दी झाली आहे. साधू-संतांची अद्भूत रुपे या मेळ्यात पहायला मिळत आहेत. अनेक साधू व साध्वी भक्तांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. त्यातच आता कुंभमेळ्यात एका गोल्डन बाबांची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या गोल्डन बाबांच्या अंगावर सुमारे सात किलोंच्या सोन्याचे दागिने आहेत. ज्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे साडेपाच ते सहा कोटी रुपये आहे.

कोण आहेत गोल्डनबाबा?
एस. के. नारायणगिरी महाराज हे सध्या गोल्डनबाबा म्हणून प्रयागराजमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते मुळचे केरळचे असून सध्या दिल्लीत राहतात. निरंजनी आखाड्याचे प्रमुख रवींद्र पुरी महाराज यांच्याकडून त्यांनी दिक्षा घेतली आहे. हे बाबा शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांच्या अंगावर सध्या सुमारे सात किलो सोने असल्याचे सांगितले जाते.
किती आहे सोने?
बाबांच्या अंगावर सुमारे सात किलोच्या जवळपास सोने आहे. त्यांच्या हाताच्या सर्व बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत. शिवाय गळ्यात मोठ-मोठ्या रुद्राक्षांचे सोन्यांनी मढवलेले दागिनेही आहेत. या बाबांच्या हातात सोन्याचे अनेक कडे आहेत. शिवाय सोन्याचे घड्याळ, सोन्याचीच काठी, सोन्याची लाँकेट्स अशी सर्व आभुषणे आहेत.
#WATCH | Prayagraj, UP | Mahamandaleshwar Narayanand Giri Maharaj of Niranjani Akhada alias Golden Baba says, "My name is Shri Shri 1008 Anant Shri Vibhushit Swami Narayan Nand Giriji Maharaj. I am from Kerala, and I am the Chairman of Sanatana Dharma Foundation... I am wearing… pic.twitter.com/xtsAVipPYd
— ANI (@ANI) January 18, 2025
काय म्हणाले बाबा?
अंगावरील सोन्याबाबत बाबांना विचारले असता ते म्हणाले की, माझे नाव श्री श्री १००८ अंतत श्री विभूषित स्वामी नारायणनंद गिरीजी आहे. मी केरळचा आहे. मी सनातन धर्म फाऊंडेशनचा अध्यक्ष आहे. मी अंगावर सुमारे ६०८ किलो सोने घातले असून गेल्या १५ वर्षांपासून माझ्या अंगावर हे सोने आहे.












Click it and Unblock the Notifications