ऑनलाईन गेमचे व्यसन; गाझियाबाद हादरले! 9 व्या मजल्यावरून उडी मारत 3 सख्ख्या बहिणीची सामूहिक आत्महत्या
Ghaziabad 3 Sisters suside news marathi : गाझियाबादमधील 'भारत सिटी' परिसरातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी ९ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. 'वनइंडिया'च्या वृत्तानुसार, या सामूहिक आत्महत्येमागे 'ऑनलाइन गेमिंग'चे प्राणघातक जाळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून ८ पानांची सुसाईड नोट हस्तगत केली आहे.

'सॉरी मम्मी-पापा' आणि रडणारा इमोजी
पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) अशी मृत मुलींची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी पॉकेट डायरीत 'हिंग्लिश'मध्ये आठ पानांचे पत्र लिहिले. "या डायरीत जे काही लिहिले आहे ते सर्व सत्य आहे, कृपया ते आताच वाचा," असे त्यांनी पत्रात नमूद केले. पत्राच्या शेवटी "I am really sorry. सॉरी मम्मी, सॉरी पापा!" असे लिहून त्यांनी एक मोठा रडणारा इमोजी काढला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री २ च्या सुमारास तिन्ही बहिणींनी आपला दरवाजा आतून बंद केला आणि खिडकीतून एकामागून एक उड्या मारल्या. आवाजामुळे इमारतीतील लोक जागे झाले. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करेपर्यंत सर्व संपले होते. हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कोरियन गेमचा 'डेथ टास्क'?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुली एका कोरियन 'टास्क-आधारित' ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्या होत्या. कोविड काळापासून त्यांना हे व्यसन जडले होते. त्यांनी स्वतःची 'कोरियन' नावेही ठेवली होती. या गेममध्ये ५० टास्क होते आणि मुली गुपचूप ते पूर्ण करत असत. काही दिवसांपूर्वीच वडिलांनी त्यांचे मोबाईल काढून घेतल्याने त्या तणावात होत्या. या आत्महत्येचा संबंध गेममधील एखाद्या 'लास्ट टास्क'शी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे..
- प्राप्त माहितीनुसार, मुली मागील २ वर्षांपासून शाळेत जात नव्हत्या.
- आर्थिक अडचण आणि अभ्यासातील कमकुवतपणा हे देखील एक कारण सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications