Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गणपती बप्पांची प्राणप्रतिष्ठा कधी करावी? हा आहे मुहूर्त, जाणून घ्या वेळ, गणेश मंत्र, आरती, स्तोत्र

Ganesh Chaturthi 2025 Ganpati pran pratishtha kadhi karavi : ढोल-ताशांचा गजर, फुलांचा सुगंध आणि मोदकांचा गोडवा... महाराष्ट्राचा लाडका बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे! गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर असून, 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने संपूर्ण देश या मंगलमय उत्सवासाठी सज्ज झाला आहे. हा केवळ एक दिवसाचा सण नसून, भक्ती, संगीत आणि उत्साहाने भरलेला दहा दिवसांचा महोत्सव आहे.

लाडक्या बप्पांची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना होते, त्यासाठी खास वेळ, मुहूर्त पाहीला जातो. लाडक्या बप्पांची प्राणप्रतिष्ठापणा कधी करावी, कोणत्या वेळा आहेत पुजा कशी करावी, आरती, स्तोत्र आणि मंत्र सर्व काही एका क्लिवर देत आहोत.

Ganesh Chaturthi 2025 Ganpati pran pratishtha kadhi karavi

गणेश चतुर्थी २०२५ ची तारीख (Ganpati pran pratishtha kadhi karavi )

हिंदू पंचांगानुसार, यंदाची गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट, बुधवार रोजी साजरी होणार आहे.

गणेश चतुर्थी तिथी सुरू: २६ ऑगस्ट २०२५, दुपारी १:५४ वाजता

गणेश चतुर्थी तिथी समाप्त: २७ ऑगस्ट २०२५, दुपारी ३:४४ वाजता

गणेश आगमन : यावर्षी बाप्पांचे आगमन हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट २०२५ होत असल्याने, दोन मोठ्या सणांचा आनंद एकत्रित अनुभवता येणार आहे.

Ganesh Chaturthi 2025 Ganpati pran pratishtha kadhi karavi

गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

गणेश प्रतिष्ठापना ही केवळ मूर्ती ठेवण्याची क्रिया नसून, ती भक्ती आणि विश्वाच्या लयाचे एकत्रीकरण आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वात शुभ वेळ मध्यान्हाची मानली जाते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई: सकाळी ११:२४ ते दुपारी १:५५ पर्यंत.
  • पुणे: सकाळी ११:२१ ते दुपारी १:५१ पर्यंत.

ही वेळ प्रमाण मानून महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त गणपती देवाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. हा शुभ मुहूर्त पूजा आणि प्रतिष्ठापनेसाठी सर्वात चांगला मानला जातो, ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरी सहजपणे प्रवाहित होतो.

गणपती आरती (Ganpati Arti)

प्रथम तुला वंदितो कृपाळा,
गजानना, गणराया

विघ्नविनाशक, गुणिजन पालक,
दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक,

तूच तुझ्यासारखा वक्रतुंड
ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया
सिद्धिविनायक तूच अनंता,
शिवात्मजा मंगला सिंदूर वदना,

विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे,
हा भवसिंधु तराया

गजवदना तब रूप मनोहर,
शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक,
सकलांची देवता

रिद्धि सिद्धीच्या वरा,
दयाळा देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा,
गजानना, गणराया

गणपती स्तोत्र (Ganpati stotra)

।। श्रीगणपती स्तोत्र ।। ...

मंगलमूर्ति ।। तुज इंद्र, चंद्र ध्याती ।।

विष्णुशंकर तुज पूजिती ।।

अव्यया ध्याती नित्यकाळीं ।।२।।

तुझें नांव विनायक ।।

गजवदना तू मंगलदायक ।।

सकळ नाम कलिमलदाहक ।।

नामस्मरणें भस्म होती ।।३।।

मी तव चरणांचा अंकित ।। तव चरणां

।। श्रीगणपती स्तोत्र ।। ...

एकदंता । दीनबंधु नमन माझें
नमन माझें शंभुतनया
नमन माझें करुणालया
नमन माझें गणराया

तुज स्वामिया नमन माझें
नमन माझें देवराया
नमन माझें गौरतनया
भालचंद्रा मोरया
तुझे चरणीं नमन माझें

नाहीं आशा स्तुतीची
नाहीं आशा तव भक्तीची
सर्व प्रकारें तुझिया दर्शनाची
आशा मनीं उपजली ।

मी मूढ केवळ अज्ञान
ध्यानीं तुझे सदा चरण । लंबोदरा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघनम कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणपती मंत्र (Ganpati mantra)

ओम गण गणपतये नमः

लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च।
अमायिने च मायाया आधाराय नमो नमः ॥

उत्सवाची तयारी आणि महत्त्व (Ganeshostav)

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. शाळांना सुट्ट्या जाहीर होतात, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोन्ही तयारीला लागतात. गणेश चतुर्थी हा सण आपल्याला शिकवतो की बाप्पा आपल्यासोबत असताना कोणतीही अडचण मोठी नसते. हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक एकोपा आणि आनंदाचे प्रतीक आहे. यंदाच्या उत्सवासाठी तुम्हीही तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+