Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : माजी RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. तोच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी आरबीआय गर्व्हनर शक्तिकांता दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपेल.

तत्पूर्वी शंक्तिकांता दास यांनी डिसेंबर 2018 मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2014 रोजी संपला होता. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.

Shaktikanta Das

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे प्रधान सचिव-2 म्हणून श्री शक्तिकांता दास, आयएएस (निवृत्त) (तामिळनाडू:1980) यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते संपणार आहे.

कोण आहेत शंक्तिकांता दास?

शक्तीकांत दास हे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील राहणारे ६७ वर्षीय शक्तीकांत दास हे १९८० च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. केंद्रात त्यांनी विविध टप्प्यांवर आर्थिक व्यवहार सचिव, वित्त सचिव आणि खत सचिव म्हणून काम पाहिले. तो दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+