मोठी बातमी : रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू; रिक्षाला कारचा धक्का लागला अन्...
गोव्यातील फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा शनिवारी दुपारी बेळगाव शहरात खून झाला. ऑटो रिक्षाला त्यांची कार धडकल्यानंतर कारचालकाने केलेल्या मारहाणीत ते मृत्यूमुखी पडले. मामलेदार हे २०१२ ते २०१७ या काळात फोंडा येथील आमदार होते. दरम्यान, मार्केट पोलिसांनी रिक्षाचालक मुजाहिद शकील जमादार (वय २८, रा. सुभाषनगर बेळगाव) याला अटक केली आहे.

नेमके काय झाले होते?
फोडा येथील माजी आमदार लवू मामलेदार (वय ६९) हे कामानिमित्त बेळगाव येथे आले होते. शहरातील खडेबाजार परिसरातील श्रीनिवास लाँजवर ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आले. त्यानंतर पुन्हा कामानिमित्त ते आपली कार घेऊन बाहेर गेले. खडेबाजार परिसरातच त्यांची कार एका ऑटो रिक्षाला घासली. त्यानंतर मामलेदार हे रिक्षाचालकाला साँरी म्हणत पुढे निघून गेले. मात्र त्यानंतर या रिक्षाचालकाने मामलेदार यांचा पाठलाग करत त्यांना लाँजच्या जवळ गाठले.
मामलेदार खाली कोसळले
रिक्षाचालकाने मामलेदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानशिलात लगावली. पुन्हा जोरदार हल्ला केला. त्यानंतर मामलेदार हे रिसेप्शनिष्ट काऊंटरजवळ खाली कोसळले. लाँजच्या मॅनेजरने तत्काळ त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मामलेदार यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत झाल्याचे समजले.
कोण होते मामलेदार?
लहू मामलेदार 2012 ते 17 या कालावधीत गोव्यात फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. २०१२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून निवडणुक जिंकली होती. त्यानंतर 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले.












Click it and Unblock the Notifications