Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुरक्षेत मोठी चूक! बड्या नेत्यावर भर लग्नात गोळीबार; 20 वर्षांपासून संधी शोधत होता आरोपी, बघा VIDEO

farooq abdullah firing attack in wedding at jammu : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी संध्याकाळी जम्मूमधील एका लग्न समारंभात प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एका ६५ वर्षीय व्यक्तीने अब्दुल्ला यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडली, मात्र NSG कमांडोच्या तत्परतेमुळे ही गोळी हुकली आणि एक मोठा अनर्थ टळला.

farooq abdullah firing attack

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या ग्रेटर कैलास परिसरातील 'रॉयल पार्क' येथे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बी.एस. चौहान यांच्या मुलीचा विवाह सोहळा सुरू होता. ८८ वर्षीय फारुख अब्दुल्ला या सोहळ्याला उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर अब्दुल्ला यांच्या अगदी पाठीमागे उभा होता. त्याने अचानक पिस्तुल काढून त्यांच्या खांद्याच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अब्दुल्ला यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) च्या कमांडोंनी क्षणाचाही विलंब न लावता हल्लेखोराला धक्का दिला आणि त्याचा हात बाजूला केला. यामुळे गोळीचे लक्ष्य चुकले आणि अब्दुल्ला सुखरूप बचावले.

हल्लेखोर ताब्यात; २० वर्षांपासून होता टप्प्यात!

हल्लेखोराची ओळख कमल सिंह जमवाल (६५) अशी पटली असून तो जम्मूच्या पुराण मंडी भागातील रहिवासी आहे. गोळीबारानंतर उपस्थित पाहुण्यांनी त्याला पकडून बेदम चोप दिला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर जमवालने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. "मी गेल्या २० वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो," असे त्याने चौकशीत सांगितले. तो 'जागरण मंच' नावाच्या एका अज्ञात संघटनेचा अध्यक्ष असल्याचेही समोर आले आहे. प्राथमिक तपासानुसार, घटनेच्या वेळी तो नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केले सुरक्षेवर प्रश्न

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "हा माझ्या वडिलांच्या हत्येचा थेट प्रयत्न होता. एका सशस्त्र व्यक्तीला Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या इतक्या जवळ कसे जाऊ दिले? हा सुरक्षेतील मोठा दोष आहे. सुदैवाने अल्लाहच्या कृपेने आणि सुरक्षा पथकाच्या तत्परतेमुळे ते बचावले."

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+