जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कॅप्टन शहीद, 4 दहशतवाद्यांना कंठस्थान, सुरक्षा दल हाय अलर्टवर
श्रीनगर - ऐन स्वांतत्र्यदिनाच्या एकदिवस आधी जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. यामध्ये लष्कराच्या एका कॅप्टनला वीरमरण आलं. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत 4 दहशतवादीही ठार झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शहीद दीपक सिंह हे 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये कॅप्टन होते. डोडा येथील आसर वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते संघाचे नेतृत्व करत होते.

लष्कराच्या म्हणण्यानुसार अजूनही चकमक सुरू आहे. दहशतवादी जंगलात एका नदीजवळ लपून गोळीबार करत आहेत. सकाळी गोळीबार सुरू असताना ते परत पळून गेले. तिथं अमेरिकन एम-4 रायफल आणि तीन बॅगमध्ये स्फोटके सापडली.
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांबाबत संरक्षणमंत्र्यांनी दिल्लीत बैठक बोलावली असून एनएसए अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख यात सहभागी झाले. तूर्त या बैठकीची माहिती समोर आलेली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल हाय अलर्टवर
स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जम्मूमध्ये लष्कराचे 3000 हून अधिक जवान आणि 2000 बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच आसाम रायफल्सचे सुमारे 1500-2000 सैनिकही तैनात केले जात आहेत.
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात तीस दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी देसा वन परिसरात लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे.












Click it and Unblock the Notifications