Big News : प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना EDचे समन्स! जाणून घ्या त्यांची किती आहे संपत्ती

ED summons Priyanka Gandhi's husband Robert Vadra : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी विभाग इडीने समन्स बजावले आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात हे समन्स त्यांना बजावण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

सोनिया गांधी यांची कन्या खासदार प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्र्रा हे आहेत. ते उद्योजक असून त्यांचे विविध व्यवसाय आहेत. प्राप्त माहितीनुसार, रिअल इस्टेट क्षेत्रातील एका वादप्रकरणात रॉबर्ट वाॅड्रा यांना समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी विभाग इडीने हरियाणा राज्यातील गुडगावमधील 3.5 एकर जागेच्या विक्री प्रकरण अर्थात शिकोपूर लँड सेल प्रकरणात हे समन्स बजावले आहे. नेहमीच्या चौकशीचा एक भाग म्हणून, अंमलबजावणी संचालनालय- ईडीने वाड्रा यांना हे समन्स बजावले आहे.

ED summons Priyanka Gandhi s husband Robert Vadra

8 एप्रिल रोजी वाड्रा यांना प्रथम चौकशीसाठी बोलावले होते; त्यानंतर ईडीने दुसऱ्यांदा बोलावले असून हरियाणाच्या गुरुग्राम क्षेत्रातील जमीन कराराशी संबंधित संबंधित कागदपत्रे मिळवण्यासंदर्भात आता इडीने हे पाऊल उचलले आहे.

Take a Poll

राॅबर्ट वाड्रांची संपत्ती किती आहे?

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी आपल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनाम दिला, त्यानंतर वायनाड येथील पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी -वाड्रा यांनी नामांकन दाखल केले, त्यावेळी त्यांनी पतीच्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. त्यानुसार राॅबर्ट वाड्रा यांची संपत्तीची माहिती समोर आली आहे.

रॉबर्ट वड्राची संपत्ती 64 कोटी आहे. त्यापैकी, प्रियंका गांधींकडे 4 कोटी 24 लाख 78 हजार 689.66 रुपये आहेत आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे 37 कोटी 47 हजारांची चल संपत्ती आहे.

रॉबर्ट वाड्राची मालमत्ता, रोख व बँक जमा

  • रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत हातात रोख 2 लाख 18 हजार 84 रुपये होते. अ‍ॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेत बँक ठेव खात्यात 3 लाख 47 हजार 31 रुपये.
  • युनियन बँक ऑफ इंडिया दिल्ली येथील खात्यात 37 हजार 361 रुपये.
  • एचडीएफसी बँक दिल्ली येथे 10 लाख 11 हजार 212 रुपये होते.
  • अॅक्सिस बँक दिल्ली येथे 94 हजार 340 रुपये तर पंजाब नॅशनल बँक दिल्ली येथे 13 हजार 252 रुपये होते.
  • यूनियन बँक दिल्ली येथील खात्यात 1 लाख 23 हजार 521 रुपये होते.
  • एसबीआय नवी दिल्ली येथील खात्यात 64 हजार 138 रुपये जमा होते.
  • रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे किती आहेत कार?
  • रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे कार आणि इतर वाहनांमध्ये 53 लाख 2009 मॉडेल टोयोटा लँड क्रूझर कार, 1 लाख 50 हजारांची 2006 ची मॉडेल मिनी कूपर कार आहे तर 4 लाख 22 हजार 400 रुपयांची 2007 सालाची मॉडेल मोटारसायकल सुजुकी आहे.
  • या व्यतिरिक्त, 2 लाख 85 हजारांचे इतर उत्पन्न, 17 हजार 439 रुपयांचे दागिने, 5 लाख 96 हजारांची सुरक्षा ठेव आहे.
  • रॉबर्ट वाड्रा यांच्याजवळ रॉबर्ट वड्रा कमर्शियल बिल्डिंग आहे. नोएडाच्या इंडिया एक्सपो मार्ट आणि गुरुग्रामच्या सेक्टर 48 मध्ये असून त्याची किंमत 2 कोटी 78 लाख 10 हजार इतकी आहे. या व्यतिरिक्त, 3 कोटी 62 लाख 10 हजार 678 रुपये जमीनीत गुंतवणूक केली गेली आहे.

राॅबर्ट वाड्रांवर किती आहे कर्ज?

प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांच्यावर एकूण 10 कोटी 3 लाख 30 हजार 374 आहे रॉबर्ट वाड्रावर 15 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये लीज सुरक्षा ठेवी, वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज यांचा समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+