प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर देशावर शोककळा; डोडा येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 10 जवान शहीद
Doda Army Vehicle Accident 10 Soldiers Martyred in Jammu & Kashmir : संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असताना, जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. कर्तव्यावर जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचे बुलेटप्रूफ वाहन भद्रवाह परिसरात सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या वेदनादायी दुर्घटनेत देशाने आपले १० शूर जवान गमावले आहेत, तर ७ जवान गंभीर जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या वाहनातून एकूण १७ जवान एका उंच ठिकाणी असलेल्या फॉरवर्ड लष्करी पोस्टवर आपल्या कर्तव्यासाठी जात होते. भद्रवाह येथील दुर्गम आणि डोंगराळ रस्त्यावरून जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. यामुळे वाहन रस्त्यावरून घसरले आणि थेट खोल दरीत कोसळले.
#WATCH | Doda, J&K | Rescue efforts underway after an army vehicle meets with an accident at Khani Top area of Bhaderwah, resulting in injuries to Army personnel.
— ANI (@ANI) January 22, 2026
The injured personnel were provided first aid at the site and were later airlifted to Udhampur for specialised… https://t.co/9xdUAss5st pic.twitter.com/ALWHb3Ar2j
दरीची खोली आणि तीव्र उतारामुळे अपघात इतका भीषण होता की, अनेक जवानांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेतील जखमी जवानांची प्रकृतीही चिंताजनक असून, त्यांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच देशाने आपले १० शूर जवान गमावल्याने संरक्षण दलात आणि देशभरात दुःखाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले दुःख
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "या कठीण काळात संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे." या दुर्घटनेत जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यासोबतच, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे जखमी जवानांना लगेच उपचार मिळू शकले, असेही ते म्हणाले.
या परिसरातील अलीकडील काळातील अशाच घटना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोटा जिल्ह्यातील ही दुर्घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीच, गुलमर्ग सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) लष्कराच्या दोन पोर्टर्सचा (सामान वाहून नेणारे) घसरून मृत्यू झाला होता. ८ जानेवारी रोजी हे पोर्टर्स 'अनिता पोस्ट'कडे जात असताना एका खोल दरीत कोसळले. त्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आणि दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत पोर्टर्स बारामुल्ला जिल्ह्यातील चंदूसा येथील रहिवासी होते.












Click it and Unblock the Notifications