Dhulivandan Holi 2025: होळीसाठी नमाजाची वेळ बदलली! मौलाना फिरंगी महाली म्हणाले- अफवांवर लक्ष देऊ नका
Dhulivandan Holi 2025 : मार्च महिना हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे, मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम. कारण, या महिन्यात हिंदू समाजाचे लोक होळीचा सण साजरा करतील आणि मुस्लिम समाजाचे लोक रमजानमध्ये उपवास करतात. होळी रमजानच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिसही सतर्क आहेत. वास्तविक, धुलीवंदन आणि शुक्रवारची प्रार्थना 14 मार्च म्हणजेच शुक्रवारी एकत्र आली आहे.
होळी आणि शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरू आणि लखनऊ इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी नमाज संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. फिरंगी महाली यांनी शुक्रवारच्या नमाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'होळी आणि रमजानचा दुसरा शुक्रवार 14 मार्च 2025 आहे.'

या संदर्भात इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने नमाजची वेळ वाढवली आहे. तसेच आपल्या हिंदू बांधवांनी होळी -धुलीवंदन मिरवणुकीच्या वेळेत बदल केला आहे. आम्हाला आशा आहे की दोन्ही समुदाय आपापल्या धर्मानुसार सण साजरा करतील. यावेळी त्यांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका आणि सण चांगला साजरा करा, असे आवाहन केले. तर दुसरीकडे होळीच्या सणापूर्वी मशिदींना ताडपत्रीचे आच्छादन लावले जात आहे.
अयोध्येत शुक्रवारी प्रार्थनेच्या वेळात बदल
एएनआय या वृत्तसंस्थेने अलीगढ जिल्ह्यातील मशिदींना ताडपत्रीने झाकल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, अलीगढ प्रशासनाच्या निर्णयानुसार होळीच्या सणाच्या आधी मशिदींना ताडपत्री लावली जात आहे. एवढेच नाही तर होळीच्या सणामुळे अयोध्येत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
पोलिसांची विनंती, धर्मगुरुंचे सहकार्य
पोलिस-प्रशासनाने मुस्लिम समाजाला नमाजच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली होती. जी अयोध्येतील मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मान्य केली आहे. मौलवी मोहम्मद हनिफ यांनी शुक्रवारच्या (जुमा) नमाजासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. मस्जिद सराय समितीचे अध्यक्ष हनिफ म्हणाले की होळीचा सण लक्षात घेऊन शुक्रवारच्या नमाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. माहिती देताना ते म्हणाले की, होळीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सर्व मशिदींमध्ये दुपारी दोननंतर शुक्रवारची नमाज अदा करण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications