Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी रेल्वे सज्ज! नागपूरसाठी 'या' शहरांतून विशेष रेल्वेसेवा, वाचा

Dhammachakra Pravartan Din 2025 Railway Announces Special Train : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या 'धम्मचक्र प्रवर्तन दिन - २०२५' (२ ऑक्टोबर) निमित्त दीक्षाभूमी, नागपूर येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने मोठे नियोजन केले आहे. प्रवाशांची प्रचंड अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन, नागपूर विभागाने महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतून नागपूरला जोडणाऱ्या अनेक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Dhammachakra Pravartan Din 2025

मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या आहेत. दीक्षाभूमीवर जाणाऱ्या लाखो अनुयायांची संख्या पाहता ही मोठी सोय केली असून या विशेष रेल्वेद्वारे मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक शहरांतून विशेष गाड्यांनी भाविकांना नागपूरला जाता येणार आहे.

प्रमुख मार्गांवरील विशेष गाड्यांचे वेळापत्रक (विशेष तक्ता)

Dhammachakra Pravartan Din 2025

नागपूर - मुंबई CSMT / मुंबई CSMT - नागपूर

गाडी क्रमांक 01020 नागपूर-CSMT विशेष : नागपूर प्रस्थान 22.30 वा. (02.10.2025), CSMT आगमन 17.20 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 01019 CSMT-नागपूर विशेष : CSMT प्रस्थान 14.30 वा. (01.10.2025), नागपूर आगमन 06.10 वा. दुसऱ्या दिवशी.
थांबे: अजनी, वर्धा, बदनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण.

नागपूर - पुणे / पुणे - नागपूर

गाडी क्रमांक 01216 नागपूर-पुणे विशेष : नागपूर प्रस्थान 23.00 वा. (02.10.2025), पुणे आगमन 16.20 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 01215 पुणे-नागपूर विशेष : पुणे प्रस्थान 14.50 वा. (01.10.2025), नागपूर आगमन 07.30 वा. दुसऱ्या दिवशी.
थांबे: अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड.

नागपूर - सोलापूर / सोलापूर - नागपूर

गाडी क्रमांक 01030 नागपूर-सोलापूर विशेष : नागपूर प्रस्थान 23.30 वा. (02.10.2025), सोलापुर आगमन 23.45 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 01029 सोलापूर-नागपूर विशेष : सोलापूर प्रस्थान 09.50 वा. (01.10.2025), नागपूर आगमन 05.10 वा. दुसऱ्या दिवशी.
थांबे: अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ.

नागपूर - नाशिक रोड / नाशिक रोड - नागपूर

गाडी क्रमांक 01232/01234 नागपूर-नाशिक रोड विशेष : नागपूर प्रस्थान 16.20 वा. (03 व 04.10.2025), नाशिक रोड आगमन 03.45 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 01231/01233 नाशिक रोड-नागपूर विशेष : नाशिक रोड प्रस्थान 18.00 वा. (01.10.2025) / 04.15 वा. (03.10.2025), नागपूर आगमन अनुक्रमे 08.00 वा. (02.10.2025) / 15.40 वा. (03.10.2025).
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा.

नागपूर - भुसावळ / भुसावळ - नागपूर

गाडी क्रमांक 01214 नागपूर-भुसावळ विशेष : नागपूर प्रस्थान 21.30 वा. (01 व 03.10.2025), भुसावळ आगमन 04.00 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 01213 भुसावळ-नागपूर विशेष : भुसावळ प्रस्थान 05.00 वा. (02 व 03.10.2025), नागपूर आगमन 12.20 वा.
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बदनेरा.

नागपूर - अकोला / अकोला - नागपूर

गाडी क्रमांक 01132 नागपूर-अकोला विशेष : नागपूर प्रस्थान 18.40 वा. (02.10.2025), अकोला आगमन 23.30 वा. त्याच दिवशी.

गाडी क्रमांक 01131 अकोला-नागपूर विशेष : अकोला प्रस्थान 00.20 वा. (03.10.2025), नागपूर आगमन 04.50 वा. त्याच दिवशी.
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव.

नागपूर - नांदेड / नांदेड - नागपूर

गाडी क्रमांक 07086 नागपूर-नांदेड विशेष : नागपूर प्रस्थान 23.55 वा. (02.10.2025), नांदेड आगमन 08.30 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 07088 नागपूर-नांदेड विशेष : नागपूर प्रस्थान 01.00 वा. (03.10.2025), नांदेड आगमन 11.00 वा. त्याच दिवशी.

गाडी क्रमांक 07085 नांदेड-नागपूर विशेष : नांदेड प्रस्थान 20.30 वा. (01.10.2025), नागपूर आगमन 10.25 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 07087 नांदेड-नागपूर विशेष : नांदेड प्रस्थान 21.15 वा. (01.10.2025), नागपूर आगमन 12.10 वा. दुसऱ्या दिवशी.
थांबे: चंद्रपूर, बल्लारपूर, हिंगोली, पूर्णा.

बिदर-अजनी -बिदर

गाडी क्रमांक 07084 अजनी-बिदर विशेष : नागपूर प्रस्थान 23.50 वा. (02.10.2025), बिदर आगमन 08.30 वा. दुसऱ्या दिवशी.

गाडी क्रमांक 07083 बिदर-अजनी विशेष : बिदर प्रस्थान 20.45 वा. (01.10.2025), अजनी आगमन 11.50 वा. दुसऱ्या दिवशी.
थांबे: चंद्रपूर, बल्लारपूर, सिरपूर कागजनगर, नांदेड.

रेल्वेचे भाविकांना आवाहन

या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे. भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षित करावे, तसेच स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+