स्वातंत्र्य दिनासाठी दिल्ली तयार! चोख सुरक्षाव्यवस्था, हे रस्ते राहणार बंद, या ठिकाणी जाणे टाळा
Independence Day 2024 : देशाच्या राजधानीत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा उपाय चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित परेडच्या आधी 15 ऑगस्टला फुल ड्रेस रिहर्सल झाली. पूर्ण ड्रेस रिहर्सलनंतर 15 ऑगस्ट रोजी अंतिम परेड होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुग्रामहून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

कोंडी टाळण्यासाठी ठोस उपाय
दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली पोलिसामनी मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. यात 15 ऑगस्टदरम्यान काही रस्ते बंद राहणार आहेत. फक्त विमानतळावर जाणाऱ्या आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल. या मार्गावरून फक्त दूध, फळे, भाजीपाला, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदींना जाण्याची परवानगी असेल. गुरुग्राममध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे.
जीवनआवश्यक वस्तूंची वाहतूक करता येणार
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई असेल. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल. यासोबतच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना ये-जा करण्यास परवानगी दिली जाईल.
या रस्त्यावर जाणे टाळा
दिल्ली पोलिसांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने काही ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
- दिल्ली पोलिसांनी नेताजी सुभाष मार्ग, लोथियान मार्ग, एसपी मुखर्जी मार्ग, चांदनी चौक रोड, निषाद राज मार्ग, लिंक रोड, राजघाटकडे जाऊ नये, असे म्हटले आहे.
- यासोबतच ISBT कडील आयपी फ्लायओव्हर बंद राहणार आहे. तसेच, लाल किल्ल्याभोवती प्रचंड वाहतूक कोंडी होऊ शकते.
- जामा मशीद, सदर बाजार, चांदणी चौकाकडे जाणे टाळावे.
- स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. यामध्ये दिल्ली गेट ते चट्टा रेल, लोथियान रोड ते जीपीओ ते चट्टा रेल, एसपी मुखर्जी मार्ग एचसी सेन मार्ग ते यमुना बाजार चौक, चांदनी चौक रोड फाउंटन चौक ते लाल किल्ला, निषाद राज रोड रिंग रोड ते नेताजी मार्ग यांचा समावेश आहे.
- सुभाष मार्गामध्ये एस्प्लानेड रोड आणि त्याचा नेताजी सुभाष मार्गापर्यंतचा लिंक रोड, राजघाट ते ISBT पर्यंतचा रिंग रोड आणि ISBT ते IP फ्लायओव्हर (सलीमगड बायपास) यांचा समावेश आहे. याशिवाय जुना लोखंडी पूल आणि गीता कॉलनी पूलही बंद राहणार आहे.
- पार्किंग लेबल नसलेल्या वाहनांनी अनेक मार्ग टाळावेत. यामध्ये सी-हेक्सागन इंडिया गेट, कोपर्निकस मार्ग, मंडी हाऊस, सिकंद्र रोड, डब्ल्यू पॉइंट, ए पॉइंट टिळक मार्ग, मथुरा रोड, बीएसझेड मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, जेएल नेहरू मार्ग, सलीमगड बायपास मार्गे निजामुद्दीन खट्टा आणि आयएसबीटी काश्मिरी गेट यांचा समावेश आहे मिडल रिंग रोडचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications