Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Delhi Railway Station Stampede : मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची घोषणा, मृतकांची नावेही आली समोर

Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली आहे. मृतांपैकी बहुतेक जण बिहारचे रहिवासी आहेत.

या घटनेनंतर रेल्वेने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये भरपाई दिली जाईल, तर गंभीर जखमी प्रवाशांना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमी प्रवाशांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, अशी माहिती आहे.

Delhi railway station stampede

रेल्वे बोर्डाने या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि प्रवाशांना विशेष गाड्यांद्वारे पाठवण्यात आले आहे. स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सामान्य झाली आहे.

या घटनेबाबत एनडीआरएफ कमांडंट दौलत राम चौधरी म्हणाले की, प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर चेंगराचेंगरी झाली होती, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली

१. आहा देवी (७९), बक्सर (बिहार) २. पिंकी देवी (४१), संगम विहार (दिल्ली) ३. शीला देवी (५०), सरिता विहार (दिल्ली) ४. व्योम (२५), बवाना (दिल्ली) ५. पूनम देवी (४०), सारण (बिहार) ६. ललिता देवी (३५), पराणा (बिहार) ७. सुरुची (११), मुझफ्फरपूर (बिहार) ८. कृष्णा देवी (४०), समस्तीपूर (बिहार) ९. विजय शाह (१५), समस्तीपूर (बिहार) १०. नीरज (१२), वैशाली (बिहार) ११. शांती देवी (४०), नवादा (बिहार) १२. पूजा कुमार (८), नवादा (बिहार) १३. संगीता मलिक (३४), भिवानी (हरियाणा) १४. पूनम (३४), महावीर एन्क्लेव्ह (दिल्ली) १५. ममता झा (४०), नांगलोई (दिल्ली) १६. रिया सिंग (७), सागरपूर (दिल्ली) १७. बेबी कुमारी (२४), बिजवासन (दिल्ली) १८. मनोज (४७), नांगलोई (दिल्ली)

उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

या घटनेनंतर, रेल्वेने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी या चेंगराचेंगरीमागील कारणांची चौकशी करेल. तसेच, रेल्वे अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे. प्रवाशांना आता कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+