Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, शीशमहालमध्ये राहणार नसल्याचं केलं स्पष्ट

Rekha Gupta Delhi CM Oath Ceremony: भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

दिल्लीच्या राजकारणात एक नवीन अध्याय जोडला गेला (Delhi New CM 2025). हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यांच्यासोबत सहा नवीन मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे.

विशेष म्हणजे शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते. मुख्यमंत्री म्हणून शीशमहालमध्ये राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

cm rekha gupta

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली , तर प्रवेश वर्मा, कपिल मिश्रा, मनजिंदर सिंग सिरसा, सविंदर इंद्रराज, पंकज सिंग आणि आशिष सूद या सहा मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा गुरुवारी रामलीला मैदानावर पार पडला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रींय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, बिहारचे मुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+