Delhi fire News : दिल्लीत भीषण आग! 400 झोपड्या जळून खाक, दोघांचा मृत्यू, रोहिणी सेक्टरमधील घटना
Delhi fire News : राजधानी दिल्लीत भीषण आग लागली आहे, रोहिणी सेक्टर 1 मध्ये जवळपास चारशे झोपड्या आगीत भस्मसात झाल्या आहेत. ही घटना आज 27 एप्रिल 2025 रोजी घडली आहे. या आगीत दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
श्री निकेतन अपार्टमेंट जवळील झोपडपट्टीत आज सकाळी अचानक ही आग लागली. आगीची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर काही तासांत आग आटोक्यात आणण्यात आली, तोपर्यंत प्राणहाणी आणि मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

400 झोपड्या जळून खाक!
दिल्लीत लागलेल्या आगीने भीषण रौद्ररुप धारण केले. आग एवढी मोठी होती की, त्यात जवळपास चारशेपेक्षा अधिक झोपड्या जळाल्या. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विद्युत विभागाच्या पंचनाम्यानंतर आगीचे कारण कळू शकणार आहे, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
काय म्हणाला प्रत्यक्षदर्शी?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एका झोपडपट्टीत लागली आणि लगेचच आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये पसरली. जवळास बारा ते तेलो लोकांचे प्राण वाचले असून शोध मोहिमेदरम्यान दोन मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा दोनपेक्षा जास्तने वाढू शकतो असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
एका आगीने अनेक संसार उघड्यावर
आग एवढी भीषण होती की, यामध्ये जवळपास चारशेपेक्षा जास्त कुटुंबाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीची भयावहता खूपच जास्त होती आजूबाजूला मोठा धुर आणि आगीचे लोळ पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत असून या दुर्घटनेत संसारउपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाली आहे. आता त्यांच्या आर्थिक समस्येना तोंड द्यावे लागेल अशी स्थिती आहे. आगीची भीषणता पाहून परिसरात मोठा गोंधळ उडाला.
आगीचे कारण काय?
या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु होते, आणखी कोणी अडकण्याची शक्यता पाहता हे कार्य अजूनही बारकाईने सुरु आहे. सध्या आगीचे कारण तपासले जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भात ठोस माहिती समजलेली नाही. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
अरुंद रस्ते, अग्निशमन दलाच्या वाहनांना अडचण
दिल्लीतील रोहीनी सेक्टर 1 मध्ये झोपड्यांची आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली, कारण या ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नव्हती. घटनास्थळी दोन मुले जळालेली आढळून आली आहेत. ही आग कशाने लागली याचा तपास यंत्रणा करत आहे.












Click it and Unblock the Notifications