दिल्लीत AAPला मोठा झटका; नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांचा पराभव, भाजपचे परवेश वर्मा विजयी
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले, भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाने आपला मोठा झटका बसला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाला असून भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा 3,186 मतांनी पराभव केला.
मनीष सिसोदीया यांचाही पराभव
दुसरीकडे, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. यात अनेक दिग्गजांचा पराभव होताना दिसत आहे. सर्वात आश्चर्यकारक निकाल जंगपुरा येथून आला. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीपासून ते मागे पडल्याचे दिसत होते. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर जंगपुरा विधानसभेची जागा व्हीआयपी झाली होती.

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय.
केजरीवालांना दिला जेलमध्ये जाण्याचा इशारा
भाजप खासदार योगेंद्र चंडोलिया यांनी दिल्ली निवडणुकीतील भाजपच्या विजयाच्या वाटचालीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे आवाहन ऐकल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. केजरीवाल सर्वच बाबतीत कोसळले आहेत. केजरीवाल तिहार तुरुंगात जातील हे निश्चित झाले आहे. असे ते म्हणाले.
हे ही वाचा : Delhi Election Result 2025 Live: दिल्लीत भाजपाला बहूमत, अरविंद केजरीवाल, सिसोदिया यांचा मोठा पराभव












Click it and Unblock the Notifications