Delhi Election: 2020 मध्ये एक्झिट पोल खरे ठरले का? पोलर्सनी काय भाकीत केले होते,जाणून घ्या
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. आता संपूर्ण देशाचे लक्ष 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानावर आहे. ही निवडणूक सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दिल्लीत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
या निवडणुकीत दिल्लीच्या राजकारणाचे भविष्यच ठरवलं जाणार नाही, तर दिल्लीतील नागरिक पुन्हा कोणत्या पक्षाकडे सत्ता सोपवतील, जो त्यांच्या विकासच्या मुद्द्यांना प्राधान्य देईल हे देखील पाहिले जाईल. ही निवडणूक देशाची राजधानी दिल्लीत होत असल्यानेही महत्त्वाची आहे.

या निवडणूकीत प्रत्येक पक्षाचे महत्त्व आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलवर एक नजर टाकूया आणि मागील एक्झिट पोल किती अचूक ठरले ते जाणून घेऊया.
दिल्ली विधानसभेसाठी उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरू होईल. ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. मतदानानंतर एक्झिट पोलद्वारे दिल्लीतील मतदारांचा कल अंदाज येईल. 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होण्यापूर्वी हे मतदान निवडणूक चर्चेचा एक महत्त्वाचा भाग बनेल.
2020 च्या निवडणुकीत एक्झिट पोलने काय भाकित केले होते?
2020 च्या दिल्ली निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये 'आप'ला मोठा विजय मिळेल, असे भाकीत करण्यात आलं होतं. त्यावेळी, बहुतेक एक्झिट पोलमध्ये 'आप'ला 50 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाने 'आप'ला 59-68 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. अखेर 'आप'ने 62 जागा जिंकल्या तर भाजपला फक्त 8 जागा मिळाल्या. हे एक्झिट पोलच्या निकालांच्या आकडेवारीच्या अगदी जवळपास होते.
2025 च्या निवडणुकीत तिरंगी लढत
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अतिशय अटीतटी होत आहे. आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, तर हरियाणा आणि महाराष्ट्रातील शानदार विजयानंतर भाजपने दिल्लीतही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणूक लढवत आहेत
या निवडणुकीत एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत, जे 70 विधानसभा जागांवर निवडणूक लढवत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ही आपच्या प्रशासन मॉडेलची आणि दिल्लीतील भाजप आणि काँग्रेसच्या भविष्याची एक महत्त्वाची परीक्षा मानली जात आहे.












Click it and Unblock the Notifications