Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आप आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, प्रचारादरम्यान महिलेला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू आहे. मतदानापूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आप आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरुद्ध एका महिलेला फ्लाइंग किस दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे. या आधारे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सध्या या प्रकरणी आमदाराकडून कोणतेही प्रतिक्रिया समोर आलेले नाही.

aap mla dinesh mohaniya

एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे. एका महिलेने आप आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरुद्ध संगम विहार पोलिस ठाण्यात फ्लाइंग किस दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी कलम 323/342/509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिनेश मोहनिया हे संगम विहार मतदारसंघातूनही उमेदवार आहेत.

दिनेश हे भाजपचे चंदन कुमार चौधरी आणि काँग्रेसचे हर्ष चौधरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. दिनेश मोहनिया यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर संगम विहार मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे आणि ते चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. वृत्तानुसार आमदार मोहनिया यांच्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

दरम्यान 23 जून 2016 रोजी त्याच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता, जेव्हा त्यांनी त्यांच्या परिसरातील पाण्याच्या समस्येबद्दल त्याच्याकडे आलेल्या महिलांच्या एका गटाशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता. यामध्ये दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि लैंगिक छळ यांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्याला भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान 2020 मध्ये दिनेश मोहनिया यांना या आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+