विकृत मानसिकतेचा कळस, पवित्र नात्याला कलंक; नराधम मुलाने स्वत:च्या आईवर केला वारंवार अत्याचार!
राजधानी दिल्लीमध्ये एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. एका 39 वर्षीय नराधम मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईवर दोन वेळा अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पीडित आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेने आई-मुलाच्या पवित्र नात्यालाच कलंक लागला आहे.
वडिलांना घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हौज काझी परिसरात घडली. पीडित महिला आपल्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी पती, आरोपी मुलगा आणि २५ वर्षीय मुलीसोबत राहत होत्या. आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्याने वडिलांना सांगितले की त्यांच्या पत्नीचे (आईचे) दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांनी घटस्फोट घ्यावा. हे सांगण्यासाठी त्याने लहानपणी आईचे असे संबंध पाहिल्याचा खोटा दावा केला.

सौदीहून परतल्यावर अत्याचार
१७ जुलै रोजी पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसोबत सौदी अरेबियाला गेल्या होत्या. याच काळात आरोपी मुलाने वडिलांना फोन करून तातडीने दिल्लीला परत बोलावले आणि पुन्हा एकदा घटस्फोटासाठी दबाव टाकला. १ ऑगस्ट रोजी जेव्हा कुटुंब दिल्लीला परतले, तेव्हा आरोपीने आईसोबत जबरदस्ती केली. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, मुलाने तिचा बुरखा काढला, तिला एका खोलीत बंद केले आणि मारहाणही केली. आईनेच लहानपणी आपल्याला बिघडवले असा विकृत आरोपही त्याने केला.
कसा घडला थरार, पोलिसांची मदत!
या घटनेमुळे घाबरलेल्या आईने शेजारी राहत असलेल्या आपल्या मोठ्या मुलीकडे आश्रय घेतला. ११ ऑगस्ट रोजी त्या पुन्हा पतीच्या घरी परतल्या, पण मुलाने तिचा पाठलाग सोडला नाही.
११ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता आरोपीने पुन्हा आईला एका खोलीत नेले आणि जबरदस्ती केली. त्यावेळी 'मी तुला जुन्या अनैतिक संबंधाची शिक्षा देत आहे' असे त्याने म्हटले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता पुन्हा एकदा त्याने हे दुष्कृत्य केले.
मुलाकडून होत असलेल्या या अत्याचाराची व्यथा आईने आपल्या लहान मुलीला सांगितली. मुलीने आईला धीर देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहित केले.
अखेर, भारतीय न्याय संहिता कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजातील नात्यांची विटंबना आणि वाढती विकृती दिसून येते.












Click it and Unblock the Notifications